साई डे संचालकांच्या कोठडीत वाढ

By Admin | Updated: April 26, 2017 01:48 IST2017-04-26T01:48:10+5:302017-04-26T01:48:27+5:30

साई डे संचालकांच्या कोठडीत वाढ

Increase in the custody of Sai Day Directors | साई डे संचालकांच्या कोठडीत वाढ

साई डे संचालकांच्या कोठडीत वाढ

नाशिक : गुंतवणुकीवर १७ टक्के व्याजाचे आमिष दाखवून एलआयसी एजंटची ३० लाख रुपयांची फसवणूक करणारे पाटील लेनमधील धनलक्ष्मी डिव्हिजन आॅफ एसडीएस प्रायव्हेट लिमिटेड व साई डे स्टार प्रायव्हेट लिमिटेडच्या चौघा संशयितांपैकी पोलिसांनी अटक केलेले विजय नंदू वानखेडे व अजय अशोक राणे या दोघांच्या पोलीस कोठडीत मंगळवारी (दि़ २५) न्यायालयाने दोन दिवसांची वाढ केली आहे़
एलआयसी एजंट मुकुंद रामदास रकटे (ए ११, हरिवंदन अपार्टमेंट, आरंभ कॉलेजजवळ, जेलरोड, नाशिकरोड) यांना गुंतवणुकीवर १७ टक्के व्याजाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ३१ लाखांची गुंतवणूक करून घेत फसवणूक केल्याप्रकरणी धनलक्ष्मी व साई डे स्टारचे संचालक विजय नंदू वानखेडे, सीमा विजय वानखेडे, अमोल प्रभाकर बाविस्कर व अजय अशोक राणे यांच्याविरोधात गुरुवारी (दि़२०) सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़
कंपनीच्या चौघा संचालकांपैकी विजय वानखेडे व अजय राणे यांना पोलिसांनी अटक करून शुक्रवारी (दि़२१) न्यायालयात केले असता २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती़ (प्रतिनिधी)

Web Title: Increase in the custody of Sai Day Directors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.