मुंजवाड ते तिळवण रस्ता ग्रामस्थांसाठी सोयीचा असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण वाढल्याने वाहनांचे नुकसान होत असून वाहनचालकांमध्ये भांडणाचे प्रमाण वाढले आहे. तसेच शेतकऱ्यांकडून प्रशासनाची परवानगी न घेता डांबर फोडून पाइपलाइनसाठी चाऱ्या केल्या जात आहेत. त्यामुळेही रस्त्याचे नुकसान होत आहे, प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
मुंजवाड ते तिळवण रस्त्यावर अपघातात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 18:56 IST