शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अपघातप्रवण क्षेत्रात वाढ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 00:48 IST

देवळा-सौंदाणे रस्त्यावर मेशी फाट्याजवळ बस आणि आॅटो रिक्षा विहिरीत कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात २६ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. तालुक्याच्या इतिहासात आतापर्यंत झालेल्या अपघातात सर्वाधिक प्राणहानी झालेली घटना म्हणून नोंदली जाईल. भावडघाटात १८ वर्षांपूर्वी साक्री आगाराची बस दरीत कोसळल्यामुळे वीस प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागल्याची आठवण यामुळे ताजी झाली.

ठळक मुद्देदेवळा : १८ वर्षांपूर्वी भावडघाटात बस कोसळल्याची आठवण ताजी

देवळा : तालुक्यात देवळा-सौंदाणे रस्त्यावर मेशी फाट्याजवळ बस आणि आॅटो रिक्षा विहिरीत कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात २६ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. तालुक्याच्या इतिहासात आतापर्यंत झालेल्या अपघातात सर्वाधिक प्राणहानी झालेली घटना म्हणून नोंदली जाईल. भावडघाटात १८ वर्षांपूर्वी साक्री आगाराचीबस दरीत कोसळल्यामुळे वीस प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागल्याची आठवण यामुळे ताजी झाली.एवढे अपघात होऊनही तालुक्यातील अपघातप्रवण क्षेत्रात वाढच होत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात भावडघाट ते देवळा, देवळा-कळवण रस्त्यावरील भऊरफाटा, देवळा- सटाणा रस्त्यावर माळवाडी फाटा व देवळा सौंदाणे रस्त्यावर खुंटेवाडी व मेशी फाट्याजवळ असलेला वळण रस्ता हे सर्वाधिक अपघातप्रवण क्षेत्र असून या ठिकाणी आतापर्यंत सर्वाधिक अपघात झालेले आहेत. शेकडो जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने या सर्व अपघातप्रवण क्षेत्रात आवश्यक तेथे वाहनचालकांना सूचित करणारे सूचनाफलक लावण्याची तसेच या सर्व अपघातप्रवण वळण रस्त्यांचे विस्तारीकरण व मजबुतीकरण करण्याची आवश्यकता आहे.तीव्र उतारामुळे वाहने सुटतात सुसाटविंचूर प्रकाशा (राज्यमार्ग क्र .७) या मार्गावरून मोठ्या प्रमाणात राज्य व आंतरराज्य वाहतूक सुरू असते. यात अवजड वाहनांचे प्रमाण लक्षणीय आहे. या रस्त्यावर भावडघाट ते देवळा शहर या सुमारे १० कि.मी. अंतरात झालेल्या अपघातात आतापर्यंत अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. भावडघाटाकडून देवळ्याकडे तीव्र उतार असल्याने वाहने सुसाट येतात, यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने, तसेच ओव्हरटेक करताना अनेक अपघात झाले आहेत. भावडघाटाच्या पायथ्याशी असलेला वळण रस्ता वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा ठरला आहे. आतापर्यंत सर्वाधिक अपघात याच ठिकाणी झाले आहेत. या मार्गावर दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून दुचाकी चालवावी लागते. या मार्गाचे त्वरित विस्तारीकरण करण्याची आवश्यकता आहे.अनेक ठिकाणी रस्त्यांवर व्यावसायिक अतिक्र मण करतात, फलक लावतात त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो तसेच अपघात होण्याची शक्यता वाढते. डांबरी रस्ता खोदून जलवाहिनी टाकण्याचे प्रकार दिसून येतात. त्यामुळे रस्त्याचे नुकसान होते. त्याची योग्य ती डागडुजी करीत नाहीत. त्या जागेवरील डांबर उखडल्यानंतर नवीन डांबर, खडी आदी टाकले जात नाही. यामुळे खड्डे पडून रस्त्यांचे नुकसान होते व अपघाताची शक्यता वाढते. या गोष्टीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असते, परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे या बाबी सर्रास सुरू असतात.रस्त्याच्या दुरुस्तीचा नुसताच सोपस्कारगतवर्षी देवळा-मालेगाव रस्त्यावरील खुंटेवाडी फाट्यावर यावल आगाराच्या सप्तशृंगगडावरून भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात झाला होता, त्यात ३९ भाविक जखमी झाले होते. वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्त्यावरील खड्ड्यांची दुरु स्ती करण्याचा सोपस्कार पूर्ण केला जातो. ही दुरु स्ती करताना गुणवत्ता राखली जाते का? हा एक मोठा प्रश्नच आहे, कारण दुरु स्तीनंतर महिनाभरातच रस्त्यावर पुन्हा खड्डे पडतात. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गुणवत्ता व नियंत्रण विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते.

टॅग्स :Accidentअपघात