शहरं
Join us  
Trending Stories
1
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
2
"मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
3
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
4
“तो येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय?”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर पुन्हा टीका
5
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
6
४ दिवसांत ४ लाख भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन; राम मंदिराला दिले दीड कोटींचे दान
7
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
8
पोर्शे कार अपघात प्रकरणावर मुनव्वर फारुकीचं ट्वीट; म्हणाला, "मी १७ वर्षांचा असताना..."
9
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!
10
Hariom Atta Listing: रिटेल इन्व्हेस्टर्सचा हिस्सा २५५६ पट भरलेला, आता २०६% प्रीमिअमवर लिस्टिंग; गुंतवणूकदार मालामाल
11
Life Lesson: जर तुम्ही चाळीशीच्या उंबरठ्यावर असाल तर पुढील चाळीस वर्षांसाठी बळ देणारी ही गोष्ट वाचा!!
12
"...नाहीतर मलाच जेलमध्ये घालतील"; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोर्शे कार अपघातावर संतप्त प्रतिक्रिया
13
मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
14
"तिला पाहिल्यावर डोळ्यात पाणी येतं", मनिषा कोईरालाबरोबरच्या ब्रेकअपनंतर दु:खी झाले होते नाना
15
₹१६७ कोटींची सॅलरी! Wipro मध्ये सर्वाधिक वेतन कोणाला मिळालं, रिशद प्रेमजी नाही तर कोण?
16
आयुष्यात पहिलीच कार खरेदी करताय; कशी निवडावी? अनेकांकडून कॉमन चुका हमखास होतात
17
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळं मिटेल"; 'बाळा'च्या आजोबांसोबत आलेल्या व्यक्तीची पोलीस आयुक्तालयातच मुजोरी
18
स्टेडियममध्ये चाहत्यांचा कहर! सेल्फीसाठी जान्हवीच्या दिशेने फेकले मोबाईल, Video व्हायरल
19
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
20
Tarot Card: येत्या आठवड्यात आव्हानं अनेक आहेत, पण चिंतन करा, चिंता नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 4:34 PM

ओझर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे काम प्रगतीपथावर असताना बस येथे थांबत नसल्याने विद्यार्थी वैतागले आहेत. यामुळे दोन तीन तास कॉलेज स्टॉपवर उभे राहून विद्यार्थी महामार्गावरील वाहनांच्या वेगाचा सामना करत आहे. ओझर महाविद्यालयाजवळील थांबा मृत्यूचे केंद्रबिंदू ठरण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देओझर : बस असून थांबत नसल्याने तीन तास जातात वाया

ओझर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे काम प्रगतीपथावर असताना बस येथे थांबत नसल्याने विद्यार्थी वैतागले आहेत. यामुळे दोन तीन तास कॉलेज स्टॉपवर उभे राहून विद्यार्थी महामार्गावरील वाहनांच्या वेगाचा सामना करत आहे.ओझर महाविद्यालयाजवळील थांबा मृत्यूचे केंद्रबिंदू ठरण्याची चिन्हे आहेत.हे महाविद्यालय महामार्गावरील टिळकनगर समोर असून सकाळी कॉलेज सुटण्याची वेळ अकराची असताना सुकेणे बस साडेदहाला येऊन जात असल्याने त्यानंतर तब्बल दीड वाजेपर्यंत मुले-मुली भर उन्हात याच दरम्यान काही बस चालक मात्र थांबा असताना सरळ निघून जात असल्याने अनेक जण बस पकडण्याच्या नादात खाली पडून जखमी झाले आहेत.एकीकडे भुयारी कामामुळे सर्व वाहन सर्व्हिसरोडने जात असून त्याच ठिकाणी जीव मुठीत धरून कमी जागेत हे सर्व विद्यार्थी उभे असतात. दिक्षी, जिव्हाळे, दात्याने, थेरगाव, ओने व कसबे, मौजे सुकेणे, मोहाडी, जानोरी, आंबे जानोरी, शिवणई आदी ठिकाणाहून सुमारे ३००,४०० मुले-मुली दररोज प्रवास करतात.याविषयी सीबीएस येथून त्यावेळी सुटणारी बस तेथूनच अर्धा तास उशिराने सुटल्यास त्याचा लाभ सर्वांनाच होणार आहे.चत्यामुळे एसटी प्रशासनाने सदर गंभीर बाबींची तातडीने दखल घेण्याची गरज असून त्यामुळे सर्वांचीच वेळेची बचत होऊन होणारे अपघात टाळले जावू शकतात.सदर ठिकाणी अंडरपासचे काम चालु असल्याने तात्पुरते निवारा शेड उभारण्यात यावे तसेच काही सिटीबसचे वाहक चालक बस रिकामी असताना देखील येथे थांबण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे याठिकाणी महामार्गावर अधिकृत थांबा असताना बस पकडायची गरज काय असा सवाल विद्यार्थी विचारत आहे.काही सिटीबस चालक विद्यार्थ्यांना त्रास देतात. एक बस निघून गेल्यावर तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. पिंपरी बस दहाव्या मैलापासून वळण घेत असताना सुध्दा वाहक बसण्यास मज्जाव करतात परिणामी कडक उन्हात एकदीड किलोमीटर पायी जावे लागते.- अभिषेक कुलकर्णी, विद्यार्थी, मोहाडी.ओझर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत अनेक तक्र ारी आल्या आहेत. सदर बाब पिंपळगाव आगारप्रमुखांना सांगितली असून दोन भरारी पथके याठिकाणी चार तास थांबून कारवाही करणार आहे.-नितीन मैंद, विभागप्रमुख, नाशिक.