शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

आयकर विभागाची फसवणूक; पाटील फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 1:20 AM

एचएएलसह विविध खासगी कंपन्या व निमसरकारी विभागातील तब्बल १ हजार ८८८ कर्मचाऱ्यांचे मागील चार वर्षांचे संशोधित व बनावट आयकर विवरणपत्र दाखल करून आयकर विभागासह करदात्यांचीही फसवणूक करणारा संशयित किशोर राजेंद्र पाटील हा अद्यापही फरार आहे.

नाशिक : एचएएलसह विविध खासगी कंपन्या व निमसरकारी विभागातील तब्बल १ हजार ८८८ कर्मचाऱ्यांचे मागील चार वर्षांचे संशोधित व बनावट आयकर विवरणपत्र दाखल करून आयकर विभागासह करदात्यांचीही फसवणूक करणारा संशयित किशोर राजेंद्र पाटील हा अद्यापही फरार आहे. दरम्यान, या प्रकरणातआयकर विभागाने फसवणूक झालेल्या करदात्यांना नोटीस बजावल्यानंतर त्यांच्याकडून सुमारे ११ कोटी ५७ लाख रुपयांची रक्कम व्याजासह वसूल केली असून, अन्य करदात्यांनीही परताव्याच्या स्वरूपात मिळालेली रक्कम व्याजासह परत करण्याची तयारी दर्शविल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली आहे. (पान ७ वर)संशयित आरोपी किशोर राजेंद्र पाटील याने आयकर कायद्यातील परताव्यासंबंधीच्या सवलतीविषयक तरतुदींचा दुरुपयोग करून गृह कर्जसंपत्तीपासून नुकसान, तसेच परिशिष्ट ५ ‘अ’ च्या ८० (सी), ८० (डी), ८० (डी डी) ८० (ई), ८० (जी), (८० जी जी) या परताव्यासंबंधी तरतुदींतीचा दुरुपयोग करून दिशाभूल करणारे संशोधित व बनावट विवरणपत्र दाखल करीत आॅनलाइन दाव्यांमार्फत कर्मचाऱ्यांच्या नावाने आयकर विभागासह शासनाची सुमारे १६ कोटी ७७ लाख ७४ हजार २३ रुपयांची फसवणूक केली आहे. संशयिताने अभियांत्रिक ीचे शिक्षण घेतलेले असतानाही संभाजी चौक, शकुंतला पार्क येथे कार्यालय थाटून लेखा व्यवसाय सुरु केला होता. याठिकाणी ज्या कर्मचाºयांना आयकर कायद्यातील क्लिष्ट तरतुदींमुळे विवरणपत्र सादर करता येत नाही अशा करदात्यांना परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याने आयकर विवरणपत्र दाखल करण्याचा व्यवसाय सुरू केला होता. यातून २०१६ ते २०१९ पर्यंत महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रा, बॉश, सिएट, सीएनपी-आयएसपी, एमएसईबी, ग्राफाइट, गायत्री पेपर, एचएएलसह एकूण १० कंपन्या व निमशासकीय विभागातील तब्बल १ हजार ८८८ कर्मचाºयांचे विवरणपत्र दाखल करण्याचे काम मिळवून त्यांना सवलत मिळवून देत प्रत्येकाकडून सवलतीच्या रक्कमच्या २० टक्के रक्कम फी म्हणून घेण्याचा उद्योग चालवला होता. मात्र ही बाब आयकर विभागाच्या लक्षात आल्याने आयकर विभागाचे अन्वेषण अधिकारी धनराज के. बोराडे यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे या प्रकरणाचा तपास करीत आहे.करदात्यांकडून व्याजासह रक्कम परतसंशयित आरोपी किशोर पाटील यांने १०१६-१७, २०१७-१८ या वर्षाचे आयकर विवरणपत्र संशोधित करीत त्यात बदल करून बनावट परतावे दाखल केले. तसेच २०१८-१९ च्या मूळ विवरणपत्रामध्येही बनावट दावे दाखल केले. ही बाब आयकर विभागाच्या लक्षात आल्यानंतर विभागाने संबंधित कर्मचाºयांना नोटीस बजावल्यानंतर संबंधित करदात्यांनी सुमारे ११ कोटी ५७ लाख रुपयांची रक्कम व्याजासह आयकर विभागाला परत केली असून, उर्वरित कर्मचारीही सवलतीच्या स्वरुपात मिळालेला परतावा आयकर विभागाला परत करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, करदात्यांनी विवरणपत्र भरण्यासाठी परताव्यातून दिलेली २० टक्के रक्कम आणि त्यावरील व्याजही करदात्यांना भरावे लागत असल्याने आयकर विभागासोबतच करदात्यांचीही संशयिताने फसवणूक केल्याचे समोर आले आहे.पोलिसांची शोध मोहीमआयकर विभाच्या फसवणूक प्रकरणातील संशयित किशोर पाटील हा मूळचा शिरपूर येथील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे नाशिक पोलिसांचे पथक शिरपूरला दाखल झाले होते. मात्र संशयित तेथूनही फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अध्याप पोलिसांची स्पष्ट ओळख समोर आलेली नाही. मात्र तो अभियंता असूनही अशाप्रकारे आयकर विभागाचे विवरणपत्र दाखल करून देण्याचा व्यवसाय करीत असल्याचे समोर आल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांनी दिली आहे.

टॅग्स :Income Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालयfraudधोकेबाजी