पाटणेत अभ्यासिकेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 00:53 IST2021-01-29T20:13:53+5:302021-01-30T00:53:00+5:30

पाटणे : गावातील पडिक दुर्लक्षित इमारतीची श्रमदानाने साफसफाई करीत तयार करण्यात आलेल्या अभ्यासिकेचे उद्घाटन जवान किरण बागुल व प्रसाद त्रिभुवन यांच्या हस्ते करण्यात आले.

Inauguration of study in Patna | पाटणेत अभ्यासिकेचे उद्घाटन

पाटणेत अभ्यासिकेचे उद्घाटन

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सरपंच राहुलाबाई अहिरे, माजी सरपंच नथू खैरनार, संदेश खैरनार, तुषार वाघ, अशोक वाघ, तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रकाश पगारे व युवक उपस्थित होते. तरुणांना स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करण्यासाठी ही अभ्यासिका निश्चितच उपयोगी पडेल. याचा आनंद पाटणे येथील तरुणांनी व्यक्त केला आहे. या उपक्रमासाठी किरण खैरनार, समाधान अहिरे, भूषण मोरे, चेतन अहिरे, दिगंबर आहिरे, निखिल आहिरे, धीरज शिंदे, गणेश आहिरे, नंदकिशोर खैरनार, अमोल पवार, रोहित सैंदाणे, रितेश खैरनार व ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष हरिदास अहिरे, उपाध्यक्ष माणिक यशोद, बी. के. आहिरे यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Inauguration of study in Patna