उद्घाटनापुर्वीच पूल गेला ‘पाण्यात’

By Admin | Updated: June 11, 2017 21:04 IST2017-06-11T21:04:35+5:302017-06-11T21:04:35+5:30

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील महिरावणी शिवारात असलेल्या गणेशगाव येथे वर्षभरापुर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुमारे सात कोटी खर्च करून पूल बांधण्यात आला होता

Before the inauguration, the pool went into the 'water' | उद्घाटनापुर्वीच पूल गेला ‘पाण्यात’

उद्घाटनापुर्वीच पूल गेला ‘पाण्यात’

नाशिक : जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील महिरावणी शिवारात असलेल्या गणेशगाव येथे वर्षभरापुर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुमारे सात कोटी खर्च करून पूल बांधण्यात आला होता; मात्र हा पूल रविवारी झालेल्या पावसात वाहून गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
महिरावणी गाव अंजनेरीजवळ असून या शिवारात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने गणेशगावामध्ये जाण्यायेण्यासाठी पूल बांधण्यात आला होता. सात कोटींचा खर्च यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने केला होता; मात्र ज्या ठेकेदाराला विभागाकडून पूलाचे काम देण्यात आले होते. त्या ठेकेदाराने कोणत्या दर्जाचे काम केले हे रविवारी उघड झाले. अवघ्या अर्धा ते पाऊ ण तास चाललेल्या पावसातच हा पूल वाहून गेला आणि रस्ताही खचला. सुदैवाने यामध्ये कुठलीही दुर्देवी घटना घडली नाही. सदर पूलाचे उद्घाटनही झाले नव्हते. उदघाटनापुर्वीच पूल पाण्यात वाहून गेल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

Web Title: Before the inauguration, the pool went into the 'water'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.