एक्सेल कप खुल्या नेमबाजी स्पर्धेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2022 01:45 IST2022-05-06T01:44:49+5:302022-05-06T01:45:15+5:30

सातपूर येथील एक्सेल टार्गेट शूटर्स असोसिएशनतर्फे आयोजित एक्सेल कप खुल्या नेमबाजी स्पर्धांचा नुकताच प्रारंभ करण्यात आला. अध्यक्षस्थानी शशिकांत पारख होते. यावेळी एक्सेल टार्गेट शूटर्स असोसिएशनचे संस्थापक भीष्मराज बाम व प्रशिक्षक मोनाली गोऱ्हे यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले. स्पर्धांमध्ये राज्यभरातून ४९२ नेमबाजांनी सहभाग नोंदविला.

Inauguration of Excel Cup Open Shooting Competition | एक्सेल कप खुल्या नेमबाजी स्पर्धेचे उद्घाटन

एक्सेल कप खुल्या नेमबाजी स्पर्धेचे उद्घाटन

मालेगाव : सातपूर येथील एक्सेल टार्गेट शूटर्स असोसिएशनतर्फे आयोजित एक्सेल कप खुल्या नेमबाजी स्पर्धांचा नुकताच प्रारंभ करण्यात आला. अध्यक्षस्थानी शशिकांत पारख होते. यावेळी एक्सेल टार्गेट शूटर्स असोसिएशनचे संस्थापक भीष्मराज बाम व प्रशिक्षक मोनाली गोऱ्हे यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले. स्पर्धांमध्ये राज्यभरातून ४९२ नेमबाजांनी सहभाग नोंदविला.

नाशिकचे पिस्तोल नेमबाज प्रतीक लोढा व पंकज बर्गे, तर एअर रायफलमध्ये अमृता पाटील, नगर येथील धनंजय नागपुरे यांनी उत्तम कामगिरी करीत खेळाची चांगली सुरुवात केली. रेंज ऑफिसर म्हणून गणेश दराडे, सौरव सालवने, गौरव व्यवहारे यांनी काम पाहिले. संस्थेच्या सचिव श्रद्धा नालमवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

Web Title: Inauguration of Excel Cup Open Shooting Competition