शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

संगणकीकृत शाळेचे उद्घाटन

By admin | Updated: October 25, 2016 00:36 IST

संगणकीकृत शाळेचे उद्घाटन

येवला : तालुक्यातील रास्ता सुरेगाव येथील जिल्हा परिषद संगणकीकृत शाळेचे उद्घाटन झाले. जिल्हा परिषदेच्या शाळा या मुलांचा पाया घडविणारे मंदिर असून,  विचाराचे, संस्कृतीचे दर्शन प्रथम  येथेच मिळते, असे प्रतिपादन पंचायती समिती साभापती प्रकाश वाघ यांनी केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब डमाळे, पंचायत समिती सदस्य हरिभाऊ जगताप, विनायक वाव्हळ प्रमुख मान्यवर हजर होते.  या वेळी वाघ पुढे म्हणाले, की संगणकामुळे बुद्धीचा विकास होतो. कौशल्य वाढते, संगणकीकृत झालेल्या शाळा यशाच्या शिखरावर निश्चित जातील तेव्हा खेड्यातील विद्यार्थी जिल्हाधिकारी व अन्य पदावर विराजमान होईल. सामाजिक कार्यकर्ते व माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब डमाळे म्हणाले की, ग्राम सहभागातून गाव व शाळांचा विकास साधला जात आहे. विचारधारा व सामाजिक ज्ञान शिक्षकाना आहे. विद्यार्थ्यांसाठी सर्वांगीण विकासाकरिता ते झटतात. म्हणून या शाळेतून भावी चांगली पिढी निश्चित तयार होईल. यावेळी डमाळे यांनी रोख स्वरूपात देणगी दिली. सुरेगावची शाळा आदर्श करा. संगणकीकृत शाळांमुळे विद्यार्थ्यांना चांगला लाभ मिळेल. आधुनिक युगात अधुनिक पद्धतीने घेतलेल्या शिक्षणामुळे कोतवाल ते पंतप्रधानापर्यंत यशस्वी होता येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  प्रास्ताविक नीलिमा थोरात यांनी केले. आभार बाबासाहेब भागवत यांनी मानले. शरद पवार यांनी सूत्रसंचलन केले. याप्रसंगी सरपंच बाबासाहेब पवार, माजी सरपंच रावसाहेब मगर, कचरू चव्हाण, वाल्मीकी मगर, पोलीसपाटील शब्बीर शहा, प्रकाश गायके, मढवईसर, मयूर पवार, मगर सर आदि मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मुख्याध्यापक फतू सय्यद, दीपक राम वंजारी, नीलिमा थोरात, सुरेखा हजारे, संगीता बनसोडे आदिंनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)