Inauguration of Agriculture Revitalization Week at Choundhane | चौंधाणे येथे कृषी संजीवनी सप्ताहाचे उदघाटन

मका पिकावरील लष्करी अळी नियंत्रण प्रचार प्रसिद्धी रथाला हिरवा झेंडा दाखवताना आमदार दिलीप बोरसे. समवेत तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार आदींसह शेतकरी.

ठळक मुद्देआमदार बोरसे यांच्या हस्ते नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन

लोकमत न्यूज नेटवर्क
सटाणा : तालुक्यातील चौंधाणे येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषी दिन साजरा करून कृषी संजीवनी सप्ताहाचा शुभारंभ आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणुन प्रांताधिकारी विजयकुमार भांगरे, तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, पंचायत समिती सभापती इंदुबाई दुमसे, लिलाबाई मोरे उपस्थित होते. प्रारंभी आमदार बोरसे यांच्या हस्ते नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पांजली वाहिली. याप्रसंगी बोलताना आमदार बोरसे यांनी वसंतराव नाईक यांनी खर्या अर्थाने हरित क्र ांती रु जविण्याचे काम केले. त्यामुळेच आज आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असल्याचे सांगितले. सदर कार्यकमाप्रसंगी विशेष केंद्रिय अर्थसहाय्य योजनेंतर्गत शेततळे खोदकाम व अस्तरीकरण अनुदानाचे धनादेश ताराबाई ढुमसे राहणार नीबाई सदाशिव गवळी, रा . विजयनगर तसेच हिरामण सोनु गावित, रा.मुंगसे या शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.
मका पिकावरील लष्करी अळी नियंत्रण प्रचार प्रसिद्धी रथाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्र मासाठी तालुका कृषी अधिकारी पवार, पंचायत समिती कृषी अधिकारी प्रणय हिरे. मंडळ कृषी अधिकारी विष्णु हयाळीज, सहाय्यक धनंजय सोनवणे उपस्थित होते. कृषी तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शननिफाड येथील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. म्हस्के यांनी मका पिकावरील लष्करी अळीबाबत मार्गदर्शन केले. अळीच्या सर्व अवस्था, त्यांची नुकसान करण्याची पद्धती याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. बिज प्रकिया, जैविक प्रकिया, शेतात पक्षी थवे उभारणे, कामगंध सापळे लावणे, निंबोळी अर्काचा वापर तसेच अळीचा जास्त प्रादुर्भाव असल्यास इमामेक्टीन वेन्झोएट पाच टक्के एसजीची फवारणी करण्याबाबत डॉ. मस्के यांनी माहिती दिली.

Web Title: Inauguration of Agriculture Revitalization Week at Choundhane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.