नाशिकला ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या खंडपीठाचे उद्घाटन

By Admin | Updated: March 23, 2015 23:59 IST2015-03-23T23:59:33+5:302015-03-23T23:59:47+5:30

एकनाथ डवले़ई - कोर्टाने लागतील प्रश्न मार्गीचव्हाण यांचे प्रतिपादन

Inaugurating the Bench of the Consumer Disputes Redressal Commission in Nashik | नाशिकला ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या खंडपीठाचे उद्घाटन

नाशिकला ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या खंडपीठाचे उद्घाटन

, नाशिक : व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून वकील व पक्षकारांना आपले म्हणणे मांडण्याची संधी उपलब्ध करून दिल्यास त्यातून जागेचा प्रश्न आपोआप सुटून कमी वेळेत गतिशील न्यायदानाचे काम करता येईल. तसेच ई-कोर्टाची अंमलबजावणी केल्यास वकील व पक्षकारांचे सर्वच प्रश्न मार्गी लागतील, असे प्रतिपादन, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तथा महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्र ार निवारण आयोगाचे अध्यक्ष आर. सी. चव्हाण यांनी केले. राज्य ग्राहक तक्र ार निवारण आयोगाच्या नाशिक परिक्रमा खंडपीठाचे उद्घाटन सोमवारी चव्हाण यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते़
यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की, परिक्रमा खंडपीठाच्या कामासाठी जागा असो अथवा नसो आहे त्या स्थितीतही चांगले काम करता येणे शक्य आहे़ या कामासाठी ई-कोर्ट तथा व्हिडीओ कॉन्फरन्सिंग संकल्पनेचा स्वीकार केल्यास जागा व वाहन पार्किंगचे प्रश्न निर्माण न होता प्रत्येकाला कमी जागेत बसल्या ठिकाणी काम करता येईल व न्यायदानाचे कामही अधिक गतीने होण्यास मदत होईल. ज्या लोकांना ग्राहक तक्र ार निवारण आयोगाची माहिती नाही त्यांनाही याकडे वळविता येईल. या खंडपीठाच्या माध्यमातून निकृष्ट प्रतीचा माल ग्राहकांना पुरविणाऱ्यांना चाप बसविण्याबरोबर यातून उत्कृष्ट दर्जाच्या वस्तू व सेवा ग्राहकांना मिळण्यास मदत होईल, असेही चव्हाण यांनी सांगितले.
महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम म्हणाले की या खंडपीठाचा केवळ नागरिकांनाच नव्हे, तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही लाभ होणार आहे़ ग्राहकाभिमुख जीवनात वस्तू खरेदी करताना अनेक जाचक अटी-शर्ती कशा लागू केल्या जातात असे सांगून या न्यायालयासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले़ प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद कारंजकर यांनी न्यायदान प्रक्रियेत इंटरनेटचे उपयोग व त्याची उपयोगाची माहिती दिली़ प्रास्ताविकात नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड़ नितीन ठाकरे यांनी वकील संघाच्या मागणीची पूर्तता झाल्याचे सांगून वकिलांना भेडसावणाऱ्या समस्यांचा उहापोह केला़
व्यासपीठावर आयुक्त एकनाथ डवले, राज्य ग्राहक आयोगाच्या सदस्य श्रीमती उमा बोरा, जिल्हा ग्राहक तक्र ार निवारण मंचचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, मुंबई ग्राहक फोरमचे अध्यक्ष अ‍ॅड. आनंद पटवर्धन, मुंबई गोवा बार कौन्सिलचे सदस्य अ‍ॅड़ जयंत जायभावे, अ‍ॅड़ बिपीन बेंडाळे, अ‍ॅड़ अविनाश भिडे, जिल्हा सरकारी वकील राजेंद्र घुमरे, अ‍ॅड़ नारायण राठी, अ‍ॅड़ हेमंत भंगाळे आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड़ जालिंदर ताडगे यांनी केले़ आभार अ‍ॅड़ सत्यजित कचोळे यांनी मानले़ या कार्यक्रमास नाशिक बार आसोसिएशनचे पदाधिकारी अ‍ॅड़ बाळासाहेब आडके, अ‍ॅड़ सुरेश निफाडे, अ‍ॅड़ मंगला शेजवळ, अ‍ॅड़ हेमंत गायकवाड, अ‍ॅड़ संजय गिते,
अ‍ॅड़ अपर्णा पाटील, अ‍ॅड़ दीपक पाटोदकर आदिंसह तालुका बार असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Inaugurating the Bench of the Consumer Disputes Redressal Commission in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.