नाशिकमध्ये शिंदे आणि शिवसेनेच्या गटामध्ये राडा, महिलांची छेड काढल्याचा आरोप करत शिंदेसैनिकांना मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 16:15 IST2022-10-05T16:07:41+5:302022-10-05T16:15:26+5:30
Shiv Sena & Shidne Group: दसरा मेळाव्यांमुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापले असतानाच, शिवसेना आणि शिंदे गटामध्ये नाशिकमध्ये वादाची ठिकणी पडली आहे. महिलांची छेड काढल्याचा दावा करत शिवसेनेच्या रणरागिणींनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली.

नाशिकमध्ये शिंदे आणि शिवसेनेच्या गटामध्ये राडा, महिलांची छेड काढल्याचा आरोप करत शिंदेसैनिकांना मारहाण
नाशिक - आज दसऱ्यानिमित्त मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शिंदे गटाचे मेळावे होणार आहेत. आपापले मेळावे यशस्वी करण्यासाठी दोन्ही गटांनी कंबर कसली असून, या मेळाव्यांची अनुक्रमे शिवाजी पार्क आणि बीकेसीमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, या मेळाव्यांमुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापले असतानाच, शिवसेना आणि शिंदे गटामध्ये नाशिकमध्ये वादाची ठिकणी पडली आहे. महिलांची छेड काढल्याचा दावा करत शिवसेनेच्या रणरागिणींनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. शिंदे गट आणि शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर मुंबईकडे येत आहेत. दरम्यान, नाशिकमधून शिंदे गटाचे शिवसैनिक मुंबईकडे येत असताना त्यांनी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना डिवचले. यावेळी शिंदे गटातील शिवसैनिकांपैकी काही शिवसैनिकांनी महिलांकडे पाहून काही हातवारे केल्याचा आरोप महिला शिवसैनिकांनी केला.
नाशिकमध्ये शिंदे गट आणि शिवसेनेच्या शिवसैनिकांमध्ये राडा, छेड काढणाऱ्या शिंदे गटाच्या सैनिकांना सेनेच्या रणरागिणींनी दिला चोप #Shivsena#nashiknewspic.twitter.com/ik3c3eewfB
— Lokmat (@lokmat) October 5, 2022
त्यानंतर शिवसैनिकांनी गाड्या अडवून शिंदेगटातील शिवसैनिकांशी वाद घातला. तसेच या कार्यकर्त्यांना गाडीबाहेर खेचून त्यांना मारहाण केली. या घटनेचे चित्रिकरणही करण्यात आले असून, त्यामध्ये गाडीतील शिवसैनिक या महिला शिवसैनिकांची माफी मागताना दिसत आहेत.