राज्यातील शाळांमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात असताना नाशिकमध्ये पाचशे बालकांचे शाळे बाहेर आंदोलन

By संजय पाठक | Updated: June 15, 2023 11:00 IST2023-06-15T10:58:09+5:302023-06-15T11:00:59+5:30

भोसलातील शिशु विहार येथील प्रकार; पाचशे मुलांनी शाळेबाहेर धरला ठिय्या

in nashik five hundred children protest outside the school while the entrance festival was in full swing in the schools of the state | राज्यातील शाळांमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात असताना नाशिकमध्ये पाचशे बालकांचे शाळे बाहेर आंदोलन

राज्यातील शाळांमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात असताना नाशिकमध्ये पाचशे बालकांचे शाळे बाहेर आंदोलन

संजय पाठक, नाशिक: राज्यातील सर्व शाळांमध्ये आज मोठ्या उत्साहात प्रवेशोत्सव साजरा होत असतानानाशिक येथील शिशु विहार शाळेत व्यवस्थापनाने धोकादायक इमारतीत शाळा भरवल्याच्या निषेधार्थ पालकांनी शाळेसमोरच बालकांसह आंदोलन सुरू केले आहे.

सुमारे पाचशे मुले यात सहभागी झाले आहेत. एकीकडे आज सर्व शाळांमध्ये मोठ्या उत्साहात प्रवेश उत्सव जात असताना दुसरीकडे या बालकांवर मात्र आंदोलनाची वेळ आली आहे गेल्या काही दिवसांपासून पालक आणि व्यवस्थापन यांच्यात वाद सुरू आहेत पालकांनी चांगली इमारत बघून  मुलांना शाळेत प्रवेश दिला मात्र व्यवस्थापनाने या मुलांची शाळा धोकादायक इमारतीत भरवली आहे असा पालकांचा आरोप आहे.

गेल्या काही दिवसांपासून या संदर्भात व्यवस्थापनाची चर्चा सुरू आहे मात्र व्यवस्थापन ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने आज पहिल्या दिवशी पालकांनीही गेटवर आंदोलन सुरू केले आहे. आज सकाळी सातवाजे पासून सुरू झालेले आंदोलन थांबवण्यासाठी व्यवस्थापनाच्या वतीने मात्र अद्याप कोणत्याही पुढाकार घेतलेला नाही उलट शाळेचे गेट बंद करण्यात आले असा आरोप पालकांनी केला आहे.

Web Title: in nashik five hundred children protest outside the school while the entrance festival was in full swing in the schools of the state