गिझरमधून गॅस गळती झाल्यानं एअर इंडियाच्या पायलटचा मृत्यू; परिसरावर पसरली शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 12:43 IST2022-02-07T12:41:50+5:302022-02-07T12:43:00+5:30

गॅस गळतीमुळे पायलटचा बाथरुममध्ये गुदमरुन मृत्यू; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

in nashik Air India pilot dies after gas leak from geyser | गिझरमधून गॅस गळती झाल्यानं एअर इंडियाच्या पायलटचा मृत्यू; परिसरावर पसरली शोककळा

गिझरमधून गॅस गळती झाल्यानं एअर इंडियाच्या पायलटचा मृत्यू; परिसरावर पसरली शोककळा

नाशिक: गॅस गिझरच्या गळतीमुळे पायलट महिलेला प्राण गमवावा लागला आहे. गॅस गिझरमधून झालेल्या गळतीमुळे महिलेचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. रश्मी गायधनी असं या महिलेचं नाव आहे. गायधनी एअर इंडियामध्ये वरिष्ठ वैमानिक पदावर कार्यरत होत्या. आंघोळीच्या वेळी गॅस गिझरमधून झालेल्या गळतीमुळे बाथरुममध्येच गुदमरून गायधनी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

गॅस गिझरमधून झालेल्या गळतीमुळे रश्मी गायधनी यांना जीव गमवावा लागला. मुंबईत एअर इंडियामध्ये त्या वरिष्ठ वैमानिक म्हणून कार्यरत होत्या. आंघोळीच्या वेळी बाथरुममधील गॅस गिझरमधून गळती सुरू झाली. त्यामुळे गुदमरुन गायधनी यांचा प्राण गेला. यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून या मृत्यूमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.
 

Web Title: in nashik Air India pilot dies after gas leak from geyser