पती रात्री झोपेत होता. त्यावेळी महिला उठली. तिने दोरी घेतली आणि पतीचा गळा आवळला. पतीचा मृत्यू होईपर्यंत तिने त्याला सोडलंच नाही. त्यानंतर त्याचा मृतदेह गावाशेजारी असलेल्या जंगलात फेकला. ही घटना घडली आहे नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात असलेल्या दरेगावामध्ये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दरेगाव येथे एका व्यक्तीचा जंगलात मृतदेह आढळून आला. मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने पोलिसांनी हत्येच्या अंगाने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. कैलास पवार असे या व्यक्तीचे नाव असल्याचे समोर आले.
महिलेने पती का हत्या का केली?
तपास सुरू असताना पोलिसांना मयत व्यक्तीच्या पत्नीची वर्तवणूक शंकास्पद वाटली. त्यामुळे पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिची चौकशी केली असता, तिने हत्या केल्याची कबुली दिली.
महिलेने पोलिसांना सांगितले की, तिचा पती म्हणजे कैलास पवार हा सतत चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्यातून तो मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता. संशय घेऊन पतीकडून सुरू असलेल्या त्रासाला ती कंटाळली. त्यानंतर तिने पतीला संपवण्याचे ठरवलं. त्यानंतर पती रात्री झोपेत असताना महिलेने दोरीने गळा आवळून हत्या केली.