शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विद्यापीठाचा जागतिक स्तरावर ठसा उमटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:37 IST

नाशिक : कोविड-१९ च्या काळात आरोग्यशास्त्रातील विद्यार्थ्यांचे कार्य महत्त्वपूर्ण असून विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी अधिकाधिक संशोधन करून जागतिक ...

नाशिक : कोविड-१९ च्या काळात आरोग्यशास्त्रातील विद्यार्थ्यांचे कार्य महत्त्वपूर्ण असून विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी अधिकाधिक संशोधन करून जागतिक स्तरावर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा ठसा उमटविणे अपेक्षित असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विसावा दीक्षांत सोहळा शुक्रवारी (दि.२९) ऑनलाइन पद्धीतीने पार पडला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति-कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, विद्यापीठ विद्याशाखांचे अधिष्ठाता डॉ. सचिन मुंब्रे, डॉ. जयंत पळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल, डॉ. राजश्री नाईक परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखाधिकारी एन.व्ही. कळसकर आदी उपस्थित होते.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गोष्टींने समाजाचा विकास होतो. त्यामुळे या गोष्टी दर्जेदार होण्यासाठी सर्वांनी विद्यापीठाने प्रयत्नशील रहावे. प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी आरोग्य क्षेत्रात जास्तीत जास्त संशोधन कार्य करुन जागतिक स्तरावर विद्यापीठाचा ठसा उमटविण्याचे आवाहनही त्यांनी केले. तर कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा सादर करतानाच विद्यापीठ आवारात लवकरच विविध वैद्यकीय अभ्यसक्रमांचे महाविद्यालय सुरू होणार असल्याचे सांगितले.

कोट-

विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी निगडित असलेले प्रलंबित अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. जे काही प्रश्न प्रलंबित आहेत ते लवकरच मार्गी लागतील. विद्यापीठ आवारात लवकरच वैद्यकीय, आयुर्वेद, होमिओपॅथी, फिजिओथेरपी अभ्यासक्रमाची विद्यापीठाची महाविद्यालये सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर केलेले आहेत. याबाबत शासनाकडे कार्यवाही सुरू असून काम अंतिम टप्प्यात आहे.

- डॉ. दिलीप म्हैसेकर, कुलगुरू

इन्फो-

८५ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक तिघांना पीएच.डी.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील उत्तीर्ण पात्र विद्यार्थ्यांना दीक्षांत समारंभात विविध विद्याशाखांच्या पदवीका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासियता पूर्ण केलेल्या ८ हजार ६४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यात वेगवेगळ्या विद्याशाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्यांना ८५ विद्यार्थ्यांना ऑनलाइन पध्दतीने सुवर्णपदक व संशोधन पूर्ण केलेल्या ३ विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली.

इन्फो -

शाखानिहाय पदवी संपादन करणारे विद्यार्थी

विद्या शाखा - विद्यार्थी संख्या

आधुनिक वैद्यक विद्याशाखा - ५१७

दंत विद्याशाखा - १,९२६

आयुर्वेद विद्याशाखा - ७२६

युनानी विद्याशाखा - ८०

होमिओपॅथी विद्याशाखा - ९४३

पीबी बी.एस्सी. नर्सिंग - ५०९

बी.पी.टी.एच. -१३४

बी.ओ.टी.एच. -१३

बी.ए. एस.एल.पी. -३४

बी.पी.ओ - ०३

डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री -०३

पदव्युत्तर विद्या शाखा-

एम.डी.मेडिकल -१०५१

एम.एस.मेडिकल - ६७३

डी.एम.मेडिकल -२४९

एम.सी.एच. मेडिकल -६७

पी.जी.डिप्लोमा - २६२