शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

मारेकऱ्यांना तत्काळ जेरबंद करा

By admin | Updated: January 24, 2016 22:37 IST

मागणी : देवगाव येथील विद्यार्थिंनी मनोषा चोपडे खून प्रकरण

लासलगाव : देवगाव येथे ३० डिसेंबरला जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या विद्यार्थिनी मनीषा चोपडे हिच्या खुनातील दोषींना अटक करण्यात तिच्या मृत्यूच्या तब्बल पंचवीस दिवसांनंतरही पोलिसांना यश न आल्याने पोलिसांच्या बेपर्वाईचा निषेध करून सीआयडीमार्फत चौकशी करावी, या मागणीसाठी प्रजासत्ताकदिनी मृत मनीषाच्या वडिलांसह चौघे आमरण उपोषण करणार आहेत. दुर्दैवी मनीषाचे वडील राजेंद्र शंकर चोपडे, बद्रीनाथ अरुण लोहारकर, धनंजय विनोद जोशी व संदीप बबन लोहारकर यांनी देवगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेतदेवगाव येथे ग्रामस्थांनी पोलिसांच्या रेंगाळलेल्या तपासाच्या निषेधार्थ आणि संशयित मोकाट असल्याने घटनेचा सखोल तपास करण्यासाठी मूक मोर्चा काढला होता. या मोर्चाचे रूपांतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर शोकसभेत झाले. त्यात मृत विद्यार्थिनीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या शोकसभेत पोलिसांवर संताप व्यक्त करून तपासाबाबत संशय व्यक्त करण्यात आला. शोकसभेत देवगावचे उपसरपंच विनोद जोशी यांनी पोलिसांवर आरोप करताना सांगितले की, मुलीचा खून झालेला असताना ते प्रकरण आत्महत्त्या केल्याचा देखावा पोलीस करत आहेत. घटनेच्या सूत्रधारांचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणी केली होती. शिवा सुराशे, धनंजय जोशी, प्रशांत कुलकर्णी, बद्रीनाथ लोहारकर, राजेंद्र मेमाने, वसंत अढांगळे यांनी पोलिसांना आवाहन केले की, घटनेचा तपास तटस्थपणे करावा. यावेळी भास्कर बोचरे, जगदीश लोहारकर, राजेंद्र चोपडे यांच्यासह गावातील दीड ते दोन हजार ग्रामस्थ सहभागी झाले होती.६ जानेवारी रोजी भरवस फाटा येथे हजारो देवगाव येथील महीना पुरूष यांच्यासह कल्याणराव पाटील, जयदत्त होळकर, देवगावचे विनोद जोशी, संभाजी पवार यांच्यासह नेत्यांनी नेतृत्व करीत रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी लवकरच आरोपींना गजाआड करू असे आश्वासनही दिले परंतु तपास ठप्प राहिला. त्यामुळे पोलीस तपासाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.