मागील वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 01:14 IST2020-08-25T21:47:05+5:302020-08-26T01:14:04+5:30

ओझर : मागील वर्षी जुलै व आॅगस्ट मध्ये नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने विविध नद्यांना पूर येऊन शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यात निफाड तालुक्यातील गोदावरी व कादवा नदीला आलेल्या महापूरामुळे नागरी वस्तीत व शेतात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. सरकारच्या वतीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देखील दिले होते. परंतु अद्यापपावेतो नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नसल्याची बाब आमदार दिलीप बनकर यांच्या निदर्शनास आणून याबाबत त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून नुकसान भरपाईच्या प्रस्तावाची माहिती घेतली.

Immediately pay the amount of compensation due to excessive rains last year | मागील वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ द्या

मागील वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ द्या

ठळक मुद्देओझर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी

ओझर : मागील वर्षी जुलै व आॅगस्ट मध्ये नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने विविध नद्यांना पूर येऊन शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यात निफाड तालुक्यातील गोदावरी व कादवा नदीला आलेल्या महापूरामुळे नागरी वस्तीत व शेतात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. सरकारच्या वतीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देखील दिले होते. परंतु अद्यापपावेतो नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नसल्याची बाब आमदार दिलीप बनकर यांच्या निदर्शनास आणून याबाबत त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून नुकसान भरपाईच्या प्रस्तावाची माहिती घेतली.
संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये ३१ कोटी ४२ लक्ष रुपये इतके नुकसान झालेले असुन त्यापैकी निफाड तालुक्यात १४ कोटी २ लक्ष रुपयांचे नुकसान झालेले आहे. या नुकसान भरपाईचा प्रस्ताव १ वर्षापासून शासनाकडे प्रलंबीत असुन नुकसान भरपाई बाबत शेतकरी वर्गाची सातत्याची मागणी लक्षात घेउन दिलीप बनकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे या नुकसान भरपाईची रक्कम शेतकºयांना उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यानंतर या संदर्भात मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांना तातडीने नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री यांनी दिल्याची माहिती आमदार बनकर यांनी दिली. (फोटो २५ ओझर)

Web Title: Immediately pay the amount of compensation due to excessive rains last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.