आयएमएतही कोविड उपचार केंद्राचा प्रस्ताव !

By संजय पाठक | Updated: April 8, 2021 17:23 IST2021-04-08T17:19:12+5:302021-04-08T17:23:30+5:30

नाशिक- कोरोना काळात सर्व डाॅक्टर आणि त्यांचे सहकारी कर्मचारी कोरोना योध्दे म्हणून काम करीत आहेत. आयएमएने या काळात खूप मोलाची भूमिका बजावली आहे. आता शालीमार येथील आयएमएच्या रूग्णालयात कोेविड उपचार सुरू करण्याचा विचार असल्याचे इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या नाशिक शाखेचे नवनिर्वाचीत अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस यांनी सांगितले.

IMD also proposes Kovid treatment center! | आयएमएतही कोविड उपचार केंद्राचा प्रस्ताव !

आयएमएतही कोविड उपचार केंद्राचा प्रस्ताव !

ठळक मुद्देनुतन अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस यांची माहितीजनजागृतीसाठी व्हीडीओ मालीका

नाशिक- कोरोना काळात सर्व डाॅक्टर आणि त्यांचे सहकारी कर्मचारी कोरोना योध्दे म्हणून काम करीत आहेत. आयएमएने या काळात खूप मोलाची भूमिका बजावली आहे. आता शालीमार येथील आयएमएच्या रूग्णालयात कोेविड उपचार सुरू करण्याचा विचार असल्याचे इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या नाशिक शाखेचे नवनिर्वाचीत अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस यांनी सांगितले.

डॉ. सोननीस यांनी नुकतीच सुत्रे घेतली. कोरोनाचा दुसरा टप्पा असताना अत्यंत आव्हानात्मक काळात त्यांनी सूत्रे स्विकारली आहेत. त्यानंतर लोकमतशी बेालताना त्यांनी आपल्या कारकिर्दीतील येाजनांची माहिती दिली.

प्रश्न- एका आव्हानात्मक स्थितीत अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारत आहात, याबद्दल काय वाटते, या काळात कोणती नवी योजना आखली आहे.
डॉ. सोननीस- कोरोना काळात म्हणजेच आव्हानात्मक काळात काम करण्याची संधी मिळाली आहे. सध्या नाशिक शहरात सध्या सर्व डॉक्टर अत्यंत कठीण काळात समाजासाठी काम करीत आहेत. त्यांनाही अनेक अडचणी आहेत. ऑक्सीजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे त्यांच्या समस्या सोडवण्यावर भर देण्यात येणार आहे आयएमए कार्यालयाच्या आवारात सध्या कोरोना चाचणी आणि लसीकरण दाेन्ही महापालिकेच्या सहकार्याने सुरू आहे. याठिकाणी बाल रूग्णालय असून सध्या कोविडमुळे ते बंद आहे. त्याठिकाणी कोविड उपचार केंद्र सुरू करता येईल काय याबाबत फिजीशियन्सशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.

प्रश्न- सध्या कोरोनाचे वाढते प्रमाण आहे. त्याबाबत आयएमए समाजासाठी काय करू इच्छीते?
डॉ. सोननीस- कोरोनाबाबत जनजागृतीची गरज आहे. सद्या जाहीर कार्यक्रमातून ते शक्य नसले तरी व्हीडीओ मालीका तयार करून ती लोकापर्यंत पोहोचवण्याचे नियोजन आहे.

प्रश्न- डॉक्टरांसाठी आणखी काय करण्याची योजना आहे.
डॉ. साेननीस- काही चांगल्या येाजना आहेत परंतु कोविडनंतर त्या प्रभावीपणे राबवता येतील. डॉक्टरच नव्हे तर समाजातील विविध घटकांसाठी संतुलीत जीवनशैली कशी असावी यावर भर देण्यात येणार आहे. धावपळ खूप होते. त्याचा मनावर आणि आरोग्यावर प्रतिकुल परीणाम होतो. त्यामुळेच केवळ कामाचा ताण न घेता कुटूंब, छंदासाठी देखील वेळ दिला पाहिजे अशाप्रकारची संतुलीत जीवन शैली आरोग्यदायी ठरेल.

Web Title: IMD also proposes Kovid treatment center!