शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आयएमए नाशिक : डॉक्टर-रुग्णातील विश्वास जोपासावा चर्चासत्रातील सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 20:53 IST

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) वतीने शालिमार येथील सभागृहात ‘डॉक्टर-रुग्ण नातेसंबंध’ या कार्यक्रमाचा समारोप ‘सुरक्षित डॉक्टर-सुरक्षित रुग्ण’ या विषयावरील चर्चासत्राने रविवारी (दि.१८) करण्यात आला.

ठळक मुद्दे ‘सुरक्षित डॉक्टर-सुरक्षित रुग्ण’ या विषयावर चर्चासत्रडॉक्टर व रुग्णांची सुरक्षितता याविषयी मंथन

नाशिक : अपुऱ्या संवादाचा अभाव, संकुचित मानसिकता आणि वैद्यकीय व्यवसायातून हरवत जाणारी नीतिमूल्ये यामुळे समाजासोबत वैद्यकीय पेशाची अपरिमित हानी होत आहे. सेवेशी संबंधित असलेल्या या पेशातून नीतिमूल्यांचे भान बाळगल्यास डॉक्टर-रुग्ण यांच्यातील ताणलेले नातेसंबंध अधिकाधिक दृढ होण्यास हातभार लागेल, असा सूर चर्चासत्रातून उमटला.इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) वतीने शालिमार येथील सभागृहात ‘डॉक्टर-रुग्ण नातेसंबंध’ या कार्यक्रमाचा समारोप ‘सुरक्षित डॉक्टर-सुरक्षित रुग्ण’ या विषयावरील चर्चासत्राने रविवारी (दि.१८) करण्यात आला. यावेळी चर्चासत्रात पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल, अ‍ॅड. एम. वाय. काळे, डॉ. एस. के. सिंगल, डॉ. अमोल अन्नदाते, डॉ. मनोज चोपडा, डॉ. बी. एस. वी. प्रसाद, डॉ. कविता गाडेकर, नियोजित अध्यक्ष डॉ. आवेश पलोड यांनी सहभागी होत डॉक्टर व रुग्णांची सुरक्षितता याविषयी मंथन केले.

प्रारंभी सद्यस्थितीत डॉक्टर आणि रुग्णांना भेडसावणा-या समस्या मांडण्यात आल्या व त्यानंतर चर्चेला सुरुवात करण्यात आली. डॉक्टरांनी आपल्याकडे येणा-या रुग्णांशी दिलासादायक संवाद साधल्यास गैरसमजला वाव उरत नाही. रुग्णांच्या प्रश्नांकडे संकुचित विचाराने न बघता व्यापकपणे सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांच्या प्रश्न व शंकांचे निरसन केल्यास डॉक्टर-रुग्ण नातेसंबंधातील विश्वासार्हता अधिक वाढते, असे मत गाडेकर यांनी यावेळी व्यक्त केले. उपचारानंतर डिस्चार्ज देताना उद्भवणारे वाद आणि उपचार खर्चाविषयी रुग्णाच्या नातेवाइकांकडून घेतली जाणारी शंका, घडणा-या घटना रोखण्यासाठी रुग्णालयांकडून उपचार खर्चाची नियमित माहिती संबंधित नातेवाइकांना समुपदेशनाच्या माध्यमातून करून देणे गरजेचे असल्याचे पाटील म्हणाले. समाज घडविणे व बिघडविण्यासाठी कालसापेक्षता महत्त्वाची ठरते. सध्याचा काळ हा टोकदार झालेल्या भावनांचा झाला असून, अशा काळातून समाज वाटचाल करत असताना व्यवसाय जरी असला तरी वैद्यकीय क्षेत्राची नाळ सेवेसोबत जुळलेली आहे. त्यामुळे समाजातील विविध घटकांविषयी भावना व्यक्त करताना वैद्यकीय क्षेत्राकडून नकारात्मक विचारसरणीची आक्रमकता समाजाला मुळीच अपेक्षित नसते, असे परखड मत यावेळी अग्रवाल यांनी मांडले. याप्रसंगी डॉ. मुकेश अग्रवाल, डॉ. सतीश पाटील, डॉ. शेखर चिरमाडे, डॉ. शोधन गोंदकर, डॉ. राहूल मोदगी यांच्यासह आयएमए सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत अध्यक्ष डॉ. मंगेश थेटे, सचिव हेमंत सोननीस यांनी केले.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्यdoctorडॉक्टर