मांसाची बेकायदेशीर वाहतूक; दोघांना अटक
By Admin | Updated: August 11, 2015 23:59 IST2015-08-11T23:58:49+5:302015-08-11T23:59:56+5:30
मांसाची बेकायदेशीर वाहतूक; दोघांना अटक

मांसाची बेकायदेशीर वाहतूक; दोघांना अटक
नाशिकरोड : जनावरांच्या मांसाची विनापरवाना बेकायदेशीरपणे वाहतूक करणारी झायलो गाडी रविवारी रात्री नाशिकरोड पोलिसांनी सिन्नर फाटा येथे पकडून मुंबईच्या दोघा जणांना अटक करण्यात आली आहे.
नाशिकरोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक दाऊद शेख शहानूर व सुनील धोंगडे हे रविवारी रात्री चेहेडी-पळसे दरम्यान सीआर मोबाइल व्हॅनमधून गस्त घालत होते. यावेळी सिन्नर फाटा बाजूकडून संशयास्पदरीत्या येणारी झायलो गाडी (एमएच ०३- बीई ६८६९) ही थांबविण्यास सांगितले असता ते अजून वेगाने पळून जाऊ लागले. पोलिसांनी त्या झायलो गाडीचा पाठलाग करून सिन्नर फाटा चौफुली येथे गाडी अडवली. झायलो गाडीतील हसीन मोहम्मद रफीक व खान जब्बार अब्दुल रा. गोवंडी मुंबई यांची विचारपूस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. पोलिसांनी झायलो गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये पाठीमागील बाजूस ताडपत्रीखाली लपविलेले तीन जनावरांचे अंदाजे ३०० किलो मांस मिळून आले. संगमनेर येथून ते दोघे सदर मांस घेऊन निघाले होते. दोघा संशयितांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सदर झायलो गाडी व मांस जप्त केले
आहे. (प्रतिनिधी)