नांदगावजवळ अवैध दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 23:11 IST2020-05-05T21:22:55+5:302020-05-05T23:11:52+5:30

नांदगाव : नायडोंगरीच्या जिल्हा सीमा तपासणी नाक्यावर हुलकावणी देऊन पळ काढणाऱ्या वाहनाचा (ओम्नी) पाठलाग करून नव्वद हजार रु पयांची दोनशे लिटर गावठी दारू पोलिसांनी जप्त केली.

 Illegal liquor seized near Nandgaon | नांदगावजवळ अवैध दारू जप्त

नांदगावजवळ अवैध दारू जप्त

नांदगाव : नायडोंगरीच्या जिल्हा सीमा तपासणी नाक्यावर हुलकावणी देऊन पळ काढणाऱ्या वाहनाचा (ओम्नी) पाठलाग करून नव्वद हजार रु पयांची दोनशे लिटर गावठी दारू पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी येवला तालुक्यातील मातुलठाण येथील गोरख बाळनाथ नागरे व राहुल रवींद्र नागरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील यंत्रणा एकीकडे अलर्ट झाली असली तरी तळीरामांच्या सोयीसाठी चोरीच्या मार्गाने चोरटी वाहतूक सुरूच असल्याचा प्रकारही यानिमित्ताने निदर्शनास आला आहे. सध्या तालुक्याच्या आमोदे, न्यायडोंगरी, कासारी, बोलठाण आदी ठिकाणी जिल्हा सीमांवर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, वाहनांना प्रतिबंध करण्यात येत आहे. उपनिरीक्षक पी. के. वाघमोडे, पोलीस नाईक आहिरे बोडके, नामदेव गांगुर्डे आदी पोलीस पथकाने हुलकावणी देऊन नांदगावच्या दिशेने धावणाºया ओम्नीचा पाठलाग केला असता व्हॅन मुद्देमालासह सापडला.

Web Title:  Illegal liquor seized near Nandgaon

टॅग्स :Nashikनाशिक