दिंडोरी तालुक्यात अवैध मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 14:45 IST2020-03-28T14:45:32+5:302020-03-28T14:45:54+5:30

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील गणेशगाव शिवारात आंबे दिंडोरी रस्त्यावर असलेल्या एका हॉटेलवर छापा टाकून चार हजार सहाशे एक्केचाळीस रु पयांचा अवैध मद्य साठा जप्त केला.

 Illegal liquor seized in Dindori taluka | दिंडोरी तालुक्यात अवैध मद्यसाठा जप्त

दिंडोरी तालुक्यात अवैध मद्यसाठा जप्त

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील गणेशगाव शिवारात आंबे दिंडोरी रस्त्यावर असलेल्या एका हॉटेलवर छापा टाकून चार हजार सहाशे एक्केचाळीस रु पयांचा अवैध मद्य साठा जप्त केला. कोरोना विषाणूच्या पाशर््वभूमीवर संपूर्ण देशात लॉक डाऊन असतांना पेठ व दिंडोरी तालुक्यातील अवैध व्यावसायिक खुलेआम बेकायदेशीररित्या मद्य विक्र ी करत असल्याचे समजते . पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे व दिंडोरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
अरु ण आव्हाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत ४६४१ रु पयाचा अवैध माल संशयित कैलास घोलप विक्र ी करीत होता. त्यास चाहूल लागताच माल सोडून तेथून तो पळून गेला. पोलीस कर्मचारी हेमंत केदा पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. ाुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरु ण आव्हाड, शंकर जाधव, दिलीप पगार, आदी करत आहे.

Web Title:  Illegal liquor seized in Dindori taluka

टॅग्स :Nashikनाशिक