सिनेस्टाइल पाठलाग करून रोखली अवैध मद्यसाठ्याची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 05:32 PM2020-01-22T17:32:10+5:302020-01-22T17:37:10+5:30

चालकाच्या सीटखालील पत्रा पोकळ असल्याचे लक्षात आल्याने कर्मचाऱ्यांनी तो काढला असता त्यामध्ये मद्याच्या काही बाटल्या आढळून आल्या. त्यामुळे संपूर्ण कारची चाचपणी पथकाकडून करण्यात आली असता चालकबाजूपासून पाठीमागच्या दरवाजापर्यंतचा सीटखालील पत्रा पोकळ असल्याचे लक्षात आले.

Illegal alcohol trafficking prevented by chainsaw chains | सिनेस्टाइल पाठलाग करून रोखली अवैध मद्यसाठ्याची वाहतूक

सिनेस्टाइल पाठलाग करून रोखली अवैध मद्यसाठ्याची वाहतूक

googlenewsNext
ठळक मुद्दे८ लाख ४२ हजार ९२६ रुपयांचा मुद्देमाल जप्तमद्यबाटल्या ठेवण्यासाठी खास तजवीज

नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभाग असो किंवा सीमावर्ती भागांमधील तपासणी नाक्यांवरील पोलीस असो त्यांच्या नजरेतून सहजरीत्या मार्गस्थ होता यावे, तपासणीदरम्यान कोणाचाही संशय बळावू नये, यासाठी एका पॉश पांढऱ्या रंगाच्या टाटा सफारी कारमधून चोरट्या मार्गाने अगदी सफाईदारपणे चोरकप्पे तयार क रून त्यामधून मद्याच्या बाटल्यांची केली जाणारी वाहतूक रोखण्यात उत्पादन शुल्क विभागाच्या क्रमांक एकच्या भरारी पथकाला यश आले. पथकाने कारसह मद्यसाठा असा सुमारे ८ लाख ४२ हजार ९२६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दादरा नगरहवेली या कें द्रशासित प्रदेशामध्ये विक्रीस मान्यता असलेल्या विविध कंपन्यांच्या मद्याच्या बाटल्यांचा साठा हरसूल-गिरणारेमार्गे शहरातून एका पांढ-या रंगाच्या पॉश टाटा सफारीमधून वाहून नेला जाणार असल्याची गोपनीय खात्रीशिर माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक अरुण सुत्रावे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने गिरणारे गावात प्रथम सापळा लावला. हरसूल-वाघेरा घाटमार्गे गुजरातकडून टाटा सफारी कार (एमएच ०३, एएम ५०७०) भरधाव वेगाने येताना दिसली. पथकाने त्यास थांबण्याचा इशारा केला, मात्र कारचालकाने त्याकडे दुर्लक्ष करत गिरणारे शिवारात कार थांबविली नाही. कारचा वेग अधिक वाढवून दुगाव-दरी- मातोरी रस्त्याने मखमलाबादमार्गे थेट पेठरोडच्या दिशेने दामटविली. दरम्यान, सिनेस्टाइल पाठलाग करत असताना कारचालकासह मालकाने पथकाला चकमा देत कार पेठरोड जकात नाक्यापर्यंत आणली आणि पोबारा केला. पाठलाग करणाºया पथकाला बेवारसस्थितीत कार रस्त्यालगत आढळली. पथकाने कारची प्रथमदर्शनी पाहणी केली, मात्र कारमध्ये काहीही आक्षेपार्ह माल आढळून आला नाही, मात्र जेव्हा कारच्या सीटखालील पोकळ भाग तपासला असता मद्याच्या लहान-मोठ्या बाटल्या आढळून आल्या. अज्ञात ट्रकचालक-मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मद्यबाटल्या ठेवण्यासाठी खास तजवीज
चालकाच्या सीटखालील पत्रा पोकळ असल्याचे लक्षात आल्याने कर्मचाऱ्यांनी तो काढला असता त्यामध्ये मद्याच्या काही बाटल्या आढळून आल्या. त्यामुळे संपूर्ण कारची चाचपणी पथकाकडून करण्यात आली असता चालकबाजूपासून पाठीमागच्या दरवाजापर्यंतचा सीटखालील पत्रा पोकळ असल्याचे लक्षात आले. हा सर्व पत्रा कर्मचा-यांनी कापून काढला असता संपूर्ण वाहन मद्याच्या बाटल्यांनी भरलेले असल्याचे आढळून आले. दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक, सुत्रावे, जवान धनराज पवार, श्याम पानसरे, विलास कुवर, सुनील पाटील, मच्छिंद्र अहिरे आदींनी कारची झाडाझडती घेतली.
--

Web Title: Illegal alcohol trafficking prevented by chainsaw chains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.