शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणमंत्र्यांच्या आदेशानंतरही चौकशीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:30 IST

नाशिक : ब्रह्मगिरी येथे उत्खनन करताना जिलेटीनचा वापर करण्यात आल्याने या प्रकरणाची चौकशी करावी, असे आदेश पर्यावरण राज्यमंत्र्यांनी देऊनही ...

नाशिक : ब्रह्मगिरी येथे उत्खनन करताना जिलेटीनचा वापर करण्यात आल्याने या प्रकरणाची चौकशी करावी, असे आदेश पर्यावरण राज्यमंत्र्यांनी देऊनही निर्धारित मुदतीत याबाबत कोणत्याही विकासकाची चौकशी करण्यात आली नसल्याने पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. मंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला सात दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपुष्टात आली आहे.

ब्रह्मगिरीसह संतोषा, भागडी येथील डोंगरावर सुरू असलेल्या उत्खननप्रकरणी पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या दालनात दि. २४ रोजी बैठक झाली होती. या बैठकीत ब्रह्मगिरी बचाव कृती समितीचे पदाधिकारी तसेच जिल्हा खनिकर्म अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तसेच मंत्रालयातील काही अधिकारी सहभागी झाले होते. पर्यावरण तसेच जैवविविधतेला धोका पोहोचविण्याचे उद्योग ब्रह्मगिरीसह संतोषा, भागडी तसेच नााशिक जिल्ह्यातील डोंगरांवर सुरू असल्याची वस्तुस्थिती मांडण्यात आली होती.

इकोसेन्सेटिव्ह झोन असतानाही महसूल तसेच वनविभागाचे सर्व नियम मोडीत काढून या ठिकाणी व्यापक उत्खनन सुरू असल्याचे पुरावे कृती समितीने राज्यमंत्र्यांना सादर केले होते. याकामी सर्व पातळीवर नियमांचे झालले उल्लंघन तसेच पर्यावरणाचा होणारा ऱ्हास याबाबतची मांडणी करण्यात आली होती. संतोषा आणि भागडी येथील डोंगर पायथ्याशी उत्खनन करताना जिलेटीनचे स्फोट घडवून आणले जात असल्याचे पर्यावरणमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते.

या तक्रारींची दखल घेत राज्यमंत्री बनसोडे यांनी संबंधित विकासकाची चौकशी करून तथ्य आढळल्यास तत्काळ गुन्हे दाखल करावेत, तसेच याप्रकरणी कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रसंगी कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारादेखील दिला होता. मात्र, इतके होऊनही गेल्या सात दिवसांत चौकशी करण्यात आली नसल्याचा आरोप ब्रह्मगिरी कृती समितीचे पदाधिकारी तसेच बेलगाव ढगा गावचे सरपंच दत्तू ढगे यांनी केला आहे.

--कोट--

आदेशाचे पालन करण्याची अपेक्षा

पर्यावरण राज्यमंत्र्यांनी आदेश देऊनही याप्रकरणाची चौकशी प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही. जिलेटीन वापराची परवानगी कुणी दिली, नियमांचा भंग करून जिलेटीनचे स्फोट केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असताना साधी चौकशीही केली नसल्याने प्रशासनाला फारसे गांभीर्य दिसत नाही.

- दत्तू ढगे, सरपंच, बेलगाव ढगा.