कंत्राटी सफाई कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 09:47 PM2020-06-07T21:47:09+5:302020-06-08T00:26:21+5:30

त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांच्या मागण्यांकडे नगर परिषद प्रशासनाने हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे आता दाद कुणाकडे मागावी, असा प्रश्न सफाई कामगारांनी केला आहे.

Ignoring the demands of contract cleaners | कंत्राटी सफाई कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष

कंत्राटी सफाई कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष

googlenewsNext
ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : संघटनेच्या शिष्टमंडळाचे नगर परिषदेस निवेदन

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांच्या मागण्यांकडे नगर परिषद प्रशासनाने हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे आता दाद कुणाकडे मागावी, असा प्रश्न सफाई कामगारांनी केला आहे.
त्र्यंबक नगर परिषदेने शासनाच्या आदेशाप्रमाणे कंत्राटी पद्धत लागू करून सफाई कामगार म्हणून ठेकेदाराकडे नियुक्ती केली आहे. ठेकेदारी पद्धत लागू झाल्यापासून ईबी इन्व्हायरो, दिशा एंटरप्रायजेस व सध्या कार्यरत असलेली व्हीडीके फॅसिलिटिज या तीनही कंपन्यांमध्ये कर्मचारी काम करीत आहेत. तथापि ईबी इन्व्हायरोने पीएफ कटिंग करून पैसे बँकेत जमा केलेच नाहीत, असा आरोप निवेदनात करत ती रक्कमदेखील आम्हाला परत मिळावी. तसेच दिशा कंपनीने आमचा दहा दिवसांचा मेहनताना दिला नाही. दरम्यान, व्हीडीके फॅसिलिटिज नाव आहे. पण प्रत्यक्षात कामगारांना काहीच फॅसिलिटिज मिळत नाही. या कंपनीने शासनाच्या निर्देशानुसार किमान वेतन मागील फरकासह देण्यात यावे. लॉकडाऊन काळात महाराष्ट्र सरकारने लागू केलेला प्रोत्साहन भत्ता मागील फरकाने देण्यात यावा, सफाई कामगारांना हँडग्लोज, गमबूट, मास्क, सॅनिटायझर व साबण दर महिन्याला देण्यात यावेत. तसेच सर्व सफाई कामगार स्थानिक असल्याने घरकुल सवलत मिळावी, पे स्लिप मिळावी, दरमहा सात तारखेपर्यंत वेतन मिळावे. शासकीय व रविवार सुट्ट्यांचे वेतन मिळत नाही ते मागील फरकासह मिळावे. तसेच सफाई कामगारांना नियमित सेवेत घ्यावे आदी मागण्यांचा निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे.

Web Title: Ignoring the demands of contract cleaners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.