शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

पशु लसीकरणाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 8:43 PM

चांदोरी : कोरोना लसीकरण सुरू असताना आता जनावरांच्या विविध आजारांवरील लसीकरण सुरू झालेले आहे. मात्र, त्याकडे फारसे लक्ष दिले ...

ठळक मुद्देघटसर्प, फऱ्या आजार : पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

चांदोरी : कोरोना लसीकरण सुरू असताना आता जनावरांच्या विविध आजारांवरील लसीकरण सुरू झालेले आहे. मात्र, त्याकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.दरवर्षी मे-जूनमध्ये घटसर्प, फऱ्या आदींसाठी राज्य शासनाच्यावतीने लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली जाते. मात्र, कोरोनाचा वाढता संसर्ग व लॉकडाऊनची परिस्थिती पाहता जनावरांच्या लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळत आहे. पशुपालक व शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांचे लसीकरण करून घेणे गरजेचे आहे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्यावतीने केले जात आहे.वातावरण बदलाचा फटका जनावरांनाही बसतो. पावसाळ्यापूर्वी ऑक्टोबर-नोव्हेंबर व मे-जूनमध्ये लसीकरण केले जाते. पावसाळ्यात हिरव्या चाऱ्यातून जनावरांना घटसर्प, फऱ्या आदी रोगांची लागण मोठ्या प्रमाणात होते. या आजारात जनावरांना ताप येणे, तोंडात फोड येणे, पायाला जखमा होणे आदी त्रास होतो. वेळीच उपचार झाला नाही तर जनावरे दगावण्याची शक्यता अधिक असते. यासाठी राज्य शासनाच्यावतीने पावसाळा सुरू होण्यापूर्वी जनावरांना लसीकरण केले जाते.

गाय व म्हैस, शेळ्या-मेंढ्या, कोंबड्यांनाही लसीकरण दिले जाते. साधारणतः महिन्याभरात ते पूर्ण करणे अपेक्षित असते. मात्र, निफाड तालुक्यात असलेल्या पशूसंख्येच्या तुलनात्मक लसीकरण अतिशय कमी आहे नागरिकांनी जवळच्या पशुचिकित्सालयाशी संपर्क साधावा व लसीकरणाबाबत माहिती घेऊन पशूंचे लसीकरण करून घ्यावे.निफाड तालुक्यात असलेले पशुधन बघता फऱ्या, घटसर्पचे लसीकरण अतिशय कमी असल्याने त्यावर पशुसंवर्धन विभागाच्यावतीने जनजागृती करण्यात येत आहे व सर्व पशुपालकांनी आपल्या जनावरांचे लसीकरण करून घ्यावे.- डॉ. सुनील अहिरे, निफाड तालुका पशुसंवर्धन अधिकारी.दुभत्या जनावरांच्या किमती लाखाच्या घरात गेल्या आहेत. यासाठी लसीकरण महत्त्वाचे असून पशुसंवर्धन विभागाने केलेल्या आवाहनाला साथ देत लसीकरण करून घ्यावे.- हृषिकेश ठाणगे, पशुपालक, चितेगाव.निफाड तालुक्यातील पशुधनगाई म्हैस - १००४८४शेळ्या/ मेंढ्या - ३०८८२कोंबड्या गावठी - ३८१०५कोंबड्या बॉयलर - ११९८२७४मागील वर्षी झालेले लसीकरणघटसर्प - ७३००फऱ्या। - ७७००घटसर्प फऱ्या - ३०९०० . 

टॅग्स :Healthआरोग्यgram panchayatग्राम पंचायत