शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
7
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
8
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
9
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
10
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
11
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
12
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
14
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
15
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
16
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
17
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
18
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
19
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
20
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

इगतपुरीचे वीर सुपुत्र सचिन चिकणे अनंतात विलीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इगतपुरी : सह्याद्री नगर (पांढरपूरवाडी) येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाचे वीर जवान सचिन चिकणे यांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इगतपुरी : सह्याद्री नगर (पांढरपूरवाडी) येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाचे वीर जवान सचिन चिकणे यांचे मंगळवारी कर्तव्यावर असताना दुर्दैवी निधन झाले. त्यांच्यावर बुधवारी (दि.१) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी

‘वीर जवान सचिन चिकणे अमर रहे' चा जयघोष करण्यात येत होता, त्यामुळे शोकाकुल वातावरणात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रथमतः वीर जवान सचिन चिकणे यांच्या पार्थिवास केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी मानवंदना देऊन पुष्पचक्र अर्पण केले. तत्पूर्वी सचिन यांचे पार्थिव घरी आणण्यात आले होते. कुटुंबीय आणि नातेवाइकांनी अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या वाहनातून शोकाकुल वातावरणात अंत्ययात्रा काढण्यात आली.

इगतपुरीच्या अमरधाम येथे त्यांना पोलीस दल व केंद्रीय राखीव पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या पार्थिवास त्यांचे मोठे बंधू सुनील चिकणे यांनी अग्नी डाग दिला.

वीर जवान सचिन चिकणे यांच्यामागे आई, पत्नी,दोन मुली, बहीण, दोन भाऊ असा परिवार आहे.

(०१ इगतपुरी जवान)

इगतपुरीचे वीर जवान सचिन चिकणे यांच्या पार्थिवास शासकीय इतमामात मानवंदना देताना उपस्थित जनसमुदाय.