इगतपुरी तालुक्यात श्रमजीवींचा भर पावसात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 04:23 PM2019-09-11T16:23:57+5:302019-09-11T16:24:43+5:30

वैतरणानगर : वावीहर्ष येथील युवकाच्या मृतदेहाचे जागेवरच शवविच्छेदन करण्यास नकार देणाऱ्या वैद्यकीय अधिका-यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र ...

In Igatpuri taluka, the rains have increased in the rain | इगतपुरी तालुक्यात श्रमजीवींचा भर पावसात ठिय्या

इगतपुरी तालुक्यात श्रमजीवींचा भर पावसात ठिय्या

Next

वैतरणानगर : वावीहर्ष येथील युवकाच्या मृतदेहाचे जागेवरच शवविच्छेदन करण्यास नकार देणाऱ्या वैद्यकीय
अधिका-यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वैतरणा येथे श्रमजीवी संघटनेच्यावतीने बुधवार, दि. ११ रोजी भरपावसात आंदोलन करण्यात आले. तालुका वैद्यकीय अधिकारी एम बी देशमुख यांनी स्वत: या ठिकाणी येऊन लेखी कारवाईचे पत्र दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
गुरूवार दि. ५ रोजी सकाळी मासेमारी करण्यासाठी वावीहर्ष येथील पिंटु वाळु शिद (२०) हा युवक पाण्यात बुडाल्याचा संशय होता. या युवकाचा शोध तब्बल पाच दिवस प्रशासन व स्थानिकांच्या मदतीने सुरू होता. पाच दिवसांनी सोमवार दि. ९ रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास या युवकाचा मृतदेह धरणाचे पाणी सोडल्याने धरणाच्या प्रवाहाजवळ सापडला. पाच दिवस युवकाचा मृतदेह पाण्यात असल्याने या मृतदेहाचे शवविच्छेदन जागेवर होणे अपेक्षित होते यासाठी पोलिस प्रशासनाने जवळील वैतरणा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. एस. लचके यांना फोन करून पाचारण केले मात्र संबधित अधिकाºयाने मी नाशिकला जात असल्याने येऊ शकणार नाही असे उत्तर दिले. व यानंतर संबधित वैद्यकीय अधिकार्यांने फोन बंद केला. मात्र यावेळी श्रमजीवी संघटना व मृताच्या कुटुंबाने वैद्यकीय अधिकारी शवविच्छेदनासाठी आल्या शिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला होता. चार तासानंतर पोलिस प्रशासनाने मध्यस्थी केल्यानंतर मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी घोटी येथे पाठवण्यात आला होता. भरपावसात श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटनीस भगवान मधे यांच्या नेतृत्वाखाली वैतरणा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. तालुका वैद्यकीय अधिकारी एम बी देशमुख यांनी जिल्हा वैद्यकीय अधिकार्यांच्या स्वाक्षरीचे लेखी पत्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सुपुर्द केल्यानंतर आंदोलन स्थिगत करण्यात आले. या पत्रात महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम १९७९ चा नियम ३ चा भंग या नियमानुसार कारवाई करणार असल्याचा उल्लेख आहे.
या आंदोलनात भगवान डोखे , तानाजी कुंदे , शांताराम भगत,संतु ठोम्बरे, तानाजी शिद, बाबुराव बांगारे, सुरेश पुंजारे , नामदेव बांगारे , संजय पारधी , पिंटू गांगड, चिमाबाई शिद , शेवंताबाई बांगारे ,अंकुश मधे , हिरामण सराई, हनुमंत गिरे, शांताराम पिंगळे , लखन डोखे, शिवाजी दराने , सुभाष मधे आदींसह संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: In Igatpuri taluka, the rains have increased in the rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक