In Igatpuri taluka | इगतपुरी तालुक्यात बंद कवाडात घटस्थापना

इगतपुरी तालुक्यात बंद कवाडात घटस्थापना

ठळक मुद्देनवरात्रोत्सव सुना सुना : भाविकांचा हिरमोड ,पोलिस बंदोबस्त

घोटी : नाशिक जिल्ह्यासह नगर व ठाणे जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कळसुबाई व घाटनदेवी येथे यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे मंदिर बंद असल्याने भाविकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. दरम्यान, तालुक्यातील प्रमुख ५ मंदिरात मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत विधिवत घटस्थापना करण्यात आली असून काही ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
महाराष्टÑातील सर्वात उंच शिखरावर कळसुबाई मातेचे मंदिर असून याठिकाणी प्रवेश बंदी असल्याने कुणालाही शिखरावर जाऊ दिले जात नाही. कोणीही वर जाण्याचा प्रयत्न केल्यास त्यास ५ हजार रु पये दंड आकारण्यात येईल असा निर्णय कळसुबाई मंदिर ट्रस्ट व ग्रामपंचायत्च्या वतीने घेण्यात आला आहे. या ठिकाणी शनिवारी (दि.१७) देवीची घटस्थापना ट्रस्ट चे विश्वस्त तुकाराम खाडे व सीताराम खाडे यांच्या हस्ते करण्यात आली घाटनदेवी माता मंदिरात पुजारी आणि विश्वस्तांनी तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या हस्ते घटस्थापना केली. अन्नपूर्णा माता मंदिरात विश्वस्त नंदकुमार शिंगवी यांच्या हस्ते तर गोंदे येथील प्रसिद्ध भवानी माता मंदिरात पुजारी शिवराम बेंडकुळे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली आहे. कपिलधारा तीर्थ कावनई जवळच कामाक्षी माता मंदिरात पुजारी प्रदीप शुक्ल व ग्रामपंचायत सदस्य याच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली.

कळसुबाई शिखरावर घटस्थापना
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून कळसूबाई परिचित आहे. घोटी शहरातील कळसुबाई मित्र मंडळाचे अध्यक्ष भागीरथ मराडे व गिर्यारोहकांकडून दरवर्षी ९ दिवस दररोज शिखर सर केले जाते आणि देवी ची पूजा अर्चा भल्या पहाटे करु न डोंगरावर स्वच्छता मोहीम राबविली जाते. यावर्षीही या गिर्याहकांनी कळसूबाई मंदिरात घटस्थापना केली.

फोटो- १७ घाटनदेवी उत्सव
घाटनदेवी मंदिराच्या प्रवेशद्वारावर नवरात्रोत्सव रद्दचा लावण्यात आलेला फलक.

 

Web Title: In Igatpuri taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.