इगतपुरीत शिवसेनेतर्फे मंगळागौर जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 01:00 IST2018-09-07T23:04:09+5:302018-09-08T01:00:51+5:30

इगतपुरी : शहरातील शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शुक्र वारी मंगळागौर जागर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

Igatpuri by Shivsena Mangalagor Jagar | इगतपुरीत शिवसेनेतर्फे मंगळागौर जागर

इगतपुरीत शिवसेनेतर्फे मंगळागौर जागर

इगतपुरी : शहरातील शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शुक्र वारी मंगळागौर जागर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राखी मुथा, सीमा इंदुलकर, चारु शीला इंदुलकर, तालुका महिला प्रमुख अलका चौधरी, शहरप्रमुख जयश्री जाधव, उपशहर प्रमुख सायली शिंदे, शीतल चव्हाण, विधानसभा संघटक परिणीता मेस्त्री, जयश्री शिंदे , आशा गांगुर्डे आदी उपस्थित होत्या.
कार्यक्र माची सुरु वात गणपती ईश स्तवनाने करण्यात आली. यावेळी झीम्मा फुगडी, अगोटे पागोटे, एक हाताची फुगडी, दंड फुगडी, त्रिकुट फुगडी, चौकट फुगडी, असरट पसरट केळीचे पान , झीम्मा, भोवर भेंडी, अडगळ गुम पडगळ गुम, आशा विविध पौराणीक मंगळा गौरीच्या खेळांनी उपस्थित महिलांना मंत्रमुग्ध केले
होते. या वेळी नगरसेविका उज्वला जगदाळे, मीनाताई खातळे, रोशनी परदेशी, आशाताई सोनवणे, आरती कर्पे, गीता मेंगाळ , महिला आघाडी पदाधिकारी सरोज राठी, सुनीता गोफणे, सुरेख मदगे आदींसह मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होत्या.

 

 

Web Title: Igatpuri by Shivsena Mangalagor Jagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.