शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

‘शुगर फ्री गोल्ड टेबल टॉप स्विटनर्स’खात असाल तर थोडं थांबा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 9:32 PM

लॅक्टोज आणि डेक्सोट्रोज हे दोन साखरद्रव्ये वापरल्याचेही नमुद केल्याचे आढळून आल्याने हा विरोधाभास असलेला दावा ग्राहकांची फसवणूकीला पुरक असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. नाशिकमधून प्रशासनाच्या पथकाने सुमारे २ लाख ३९ हजार २८० रूपयांचा मोठा साठा जप्त केला आहे.

ठळक मुद्देलॅक्टोज आणि डेक्सोट्रोज हे दोन साखरद्रव्ये वापरल्याचेही नमुद ‘शुगर फ्री’ व १०० टक्के सुरक्षित असा केला जाणारा दावा थोतांड

नाशिक : ‘शुगर फ्री’ म्हणून गोल्ड टेबल टॉप स्विटनर्सला पसंती देत असाल तर,थोडं सावधान....कारण या उत्पादनाच्या बाबतीत ‘शुगर फ्री’ व १०० टक्के सुरक्षित असा केला जाणारा दावा हा थोतांड असल्याचे अन्न औषध प्रशासनाच्या कारवाईनंतर स्पष्ट झाले आहे. कारण या उत्पादनाच्या वेष्टणावरच उत्पादकाने एका बाजूला ‘शुगर फ्री’ तर दुसऱ्या बाजूला लॅक्टोज आणि डेक्सोट्रोज हे दोन साखरद्रव्ये वापरल्याचेही नमुद केल्याचे आढळून आल्याने हा विरोधाभास असलेला दावा ग्राहकांची फसवणूकीला पुरक असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. नाशिकमधून प्रशासनाच्या पथकाने सुमारे २ लाख ३९ हजार २८० रूपयांचा मोठा साठा जप्त केला आहे.अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम २४नुसार अन्नपदार्थांसंबंधात ग्राहकांची दिशाभूल करणाºया जाहिराती करु न ‘शुगर फ्री’ गोल्ड टेबल टॉप स्वीटनर्सची सर्रास विक्री सुरू होती. ही बाबल लक्षात आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने नाशिक शहरातील अन्न पदार्थांचे पंचवटीमधील सुपर स्टॉकिस्ट मे.जे.के. अ‍ॅण्ड सन्स, रविवार कारंजावरील मे.प्रफुल्ल ट्रेडर्स या घाऊक व्यावसायिकांकडून प्रत्येकी अनुक्रमे १लाख ३६ हजार २१० रूपये तर १ लाख ३ हजार ७० रूपये असा  २ लाख ३९ हजार २८० रूपयांचा साठा जप्त केला आहे.साखरेऐवजी कृत्रिम गोडी आणणारे खाद्यपदार्थ वापरण्यात नागरिकांचा कल आहे. त्यामुळे असे खाद्यपदार्थांमध्ये ‘शुगर फ्री टेबल टॉप स्विटनर’ हा एक प्रसिध्द व नामांकित ब्रॅन्ड आहे. या ब्रँडनेही १०० टक्के सुरक्षीत अशी जाहिरात करु न विक्र ी वर भर दिला. मात्र त्यांच्या खाद्यपदार्थाच्या वेष्टणावर उत्पादनात अ‍ॅसपारटेम नावाचा घटक असल्याने लहान मुलांसाठी व फेनाईल केटोनोरीया या आजाराचय रु ग्णांसाठी उत्पादन योग्य नसल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे. उत्पादनावरील सामविष्ट घटक ांच्या यादीतील विसंगत माहितीमुळे ग्राहकांची फसवणूक होण्याचा धोका अन्न व औषध प्रशासनाच्या लक्षात आला. त्यामुळे सहायक आयुक्त सी.डी.राठोड, व सह आयुक्त सी.डी.साळुंके यांच्या आदेशान्वये अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर, संदीप देवरे यांनी रविवार कारंजा, पंचवटी परिसरातील दोन घाऊक व्यापाऱ्यांकडून या उत्पादनाचा मोठा साठा जप्त केला. आहे. या उत्पादनाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. पुढील तपास बाविस्कर व देवरे हे करीत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागCrime Newsगुन्हेगारी