शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

ईदगाह मैदान : शनिवारी सामूहिक नमाजपठणाचा सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 9:17 PM

शुक्रवारी कुठल्याही प्रकारचे ढगाळ हवामान नसल्यामुळे शहरासह उपनगरांमध्ये संध्याकाळी स्पष्ट चंद्रकोर मुस्लीम बांधवांना बघता आली. याबरोबरच रमजान पर्वाची सांगता होऊन पुढील उर्दू महिना शव्वालची १ तारीख मोजली गेली.

ठळक मुद्दे चंद्रदर्शन घडल्याने शनिवारी ईद साजरी करण्याची घोषणा चंद्रदर्शन घडल्यामुळे ईद साजरी करण्याविषयीचा संभ्रम दूर

नाशिक : मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान पर्वाची चंद्रदर्शन घडल्याने शुक्रवारी (दि. १५) संध्याकाळी सांगता झाली. शनिवारी (दि. १६) शहरासह जिल्हाभरात सर्वत्र ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद साजरी केली जाणार आहे. शहरातील शहाजहॉँनी ईदगाह मैदानावर सकाळी १० वाजता पारंपरिक पद्धतीने सामूहिक नमाजपठणाचा सोहळा पार पडणार आहे.पुण्यकर्म व उपासनेसोबत मानवतेची शिकवण देणारे पर्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमजान या उर्दू महिन्याचे २९ दिवस पूर्ण झाले. शुक्रवारी कुठल्याही प्रकारचे ढगाळ हवामान नसल्यामुळे शहरासह उपनगरांमध्ये संध्याकाळी स्पष्ट चंद्रकोर मुस्लीम बांधवांना बघता आली. याबरोबरच रमजान पर्वाची सांगता होऊन पुढील उर्दू महिना शव्वालची १ तारीख मोजली गेली. शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांनी तत्काळ शाही मशिदीमधून चंद्रदर्शन घडल्याने शनिवारी ईद साजरी करण्याची घोषणा केली. चंद्रदर्शन घडल्यामुळे ईद साजरी करण्याविषयीचा संभ्रम दूर झाला. चंद्रदर्शन शहरात घडले नसते किंवा अन्य शहरांमधूनही प्रत्यक्षदर्शींची ग्वाही प्राप्त झाली नसती तर रमजानचे तीस दिवस पूर्ण करून रविवारी ईद साजरी झाली असती. रमजान पर्वाचा प्रारंभ आणि सांगता शुक्रवारीच झाली. बहुतांश मुस्लीम बांधवांनी महिनाभर निर्जळी उपवास करत अल्लाहची उपासना केली. यंदा मे महिन्यात रमजानला सुरुवात झाली होती. रमजानचा पंधरवडा संपूर्ण मे महिन्यात होता. त्यामुळे उन्हाची प्रचंड तीव्रता अनुभवत मुस्लीम बांधवांनी उपवास के ले.‘चांद मुबारक’च्या शुभेच्छाशुक्रवारी संध्याकाळी समाजबांधवांनी एकमेकांना ‘चांद मुबारक’ अशा शुभेच्छा दिल्या. दरम्यान, संध्याकाळी जुने नाशिक परिसरातील चौक मंडई, शहीद अब्दुल हमीद चौक, भद्रकाली, मेनरोड, रविवार कारंजा आदी परिसरातील बाजारपेठेत मोठी गर्दी उसळली होती. रात्री उशिरापर्यंत नागरिकांची गर्दी कायम होती. या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. खरेदीसाठी मोठ्या संख्येने नागरिक बाहेर पडल्याने बाजार फुलला होता. सुकामेवा, नवीन कपडे, पादत्राणे, मेहंदी, अत्तर, टोपी, सुरमा आदींना मागणी वाढली होती.ईदगाह सज्जनमाजपठणाच्या सोहळ्यासाठी ईदगाह मैदान सज्ज करण्यात आले होते. शुक्रवारी संध्याकाळी चंद्रदर्शन घडताच ईदगाहचे दोन्ही प्रवेशद्वार पोलिसांकडून बंद करण्यात आले होते. मैदानाचा ताबा पोलिसांकडून घेण्यात आला होता. मैदानाचे सपाटीकरण करून दोन्ही बाजूला पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

टॅग्स :Ramzan Eidरमजान ईदRamzanरमजान