शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सुरू करण्याचा धोका ओळखा ; मुख्याध्यापक संघाचे मुख्यमंत्र्यांना पत्र  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 21:01 IST

नाशिक आणि महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरू करण्यातील धोका ओळखून शिक्षण विभागाने जुलैपासून शाळा सुरू करण्याचे आणि त्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक सभा बोलावण्याचे काढलेले आदेश तत्काळ मागे घ्यावे, असे आवाहन मुख्याध्यापक संघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केले आहे. 

ठळक मुद्देकोरोनाचा सामना करण्यास मुख्याध्य़ापक सक्षम नाहीएसएमसी, पीटीएच्या चर्चेनंतरही संभ्रमावस्था कायममुख्याध्यापक संघाचा मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे निर्वाळा

नाशिक : जागतिक आरोग्य संघटनेनेच्या अहवालानुसार कोरोना व्हायरसची दुसरी मोठी लाट जगभर सुरू झाली असून, अशा स्थितीत नाशिक आणि महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरू करण्यातील धोका ओळखून शिक्षण विभागाने जुलैपासून शाळा सुरू करण्याचे आणि त्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक सभा बोलावण्याचे काढलेले आदेश तत्काळ मागे घ्यावे, असे आवाहन मुख्याध्यापक संघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केले आहे. शाळा सुरू करायच्या किंवा कसे, याबद्दलचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीवर टाकणे अत्यंत गैर आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे किंवा कसे, हे सांगण्याचा अधिकार महाराष्ट्र शासन आणि स्थानिक प्रशासनाचा आहे. ती जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर टाकणे धोकादायक ठरू शकेल, असेही या पत्रात नमूद करण्यात आले असून प्रथम नाशिक आणि महाराष्ट्र कोरोना संकटातून मुक्तझाल्याचे शासनाने आधी जाहीर करावे आणि मगच शाळा, कॉलेज फिजिकली सुरू करण्याबाबतचा निर्णय घ्यावा. तोपर्यंत शिक्षणात खंड पडू नये यासाठी आॅनलाइन, टीव्ही, वर्कबुक, अ‍ॅक्टिव्हिटी बुक, प्री लोडेड टॅब अशा सगळ्या पयार्यांचा विचार करण्याची गरज असल्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी केलेल्या आहे. परंतु, बंगळुरूच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ एंड न्यूरो-साइंसेज संस्थेने मोबाइल किंवा ऑनलाइन शिक्षण देणे हे मुलांच्या आरोग्यास घातक असल्याचे स्पष्ट केल्याचा दाखला देत खासगी शाळांनी सुरू केलेल्या ऑनलाइन शिक्षणाच्या माऱ्यालाही तत्काळ वेसण घालण्याचे आवाहनही मुख्याध्यापक संघाने यापत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केले आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकSchoolशाळाChief Ministerमुख्यमंत्रीTeacherशिक्षकStudentविद्यार्थी