ड्रगिस्ट संघटनेतर्फे आदर्श केमिस्टचा गुणगौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 22:54 IST2018-09-29T22:53:24+5:302018-09-29T22:54:12+5:30
सिन्नर : तालुका केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने महालक्ष्मी हॉल येथे जागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून शहरातून दोन व ग्रामीण विभागातून दोन अशा चार फार्मासिस्टने दीर्घकाळापासून रुग्ण व ग्राहकांना प्रभावी व अविरक्तपणे प्रामाणिक सेवा देण्याचे काम करणाऱ्या औषधे विक्रेत्यांचा गौरव करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांना मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देण्यात आले.

ड्रगिस्ट संघटनेतर्फे आदर्श केमिस्टचा गुणगौरव
सिन्नर : तालुका केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने महालक्ष्मी हॉल येथे जागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून शहरातून दोन व ग्रामीण विभागातून दोन अशा चार फार्मासिस्टने दीर्घकाळापासून रुग्ण व ग्राहकांना प्रभावी व अविरक्तपणे प्रामाणिक सेवा देण्याचे काम करणाऱ्या औषधे विक्रेत्यांचा गौरव करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांना मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देण्यात आले.
शुक्रवारी (दि. २८) अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने शासनाच्या अन्यायकारक आॅनलाइन फार्मसी व ई-पोर्टल या कायद्याविरोधात पुकारलेला बंद यशस्वी करण्यात आला. महाराष्टÑ केमिस्ट कौन्सिलचे सदस्य सुरेश पाटील, माजी फार्मसी कौन्सिल सदस्य राजाभाऊ नवले, नाशिक जिल्हा केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल आहिरे आदी मान्यवर उपस्थित होते. आदर्श केमिस्ट म्हणून सुदेश खुळे, शरदचंद्र घुले, अनिल लहामगे, अतुल कासट यांचा गौरव करण्यात आला. संघटनेप्रती बांधिलकी व प्रामाणिक मेहनत यांचे फळ असून, तालुका संघटनेच्या पदाधिकाºयांचे सत्कारार्थींनी आभार मानले. बाळासाहेब सदगीर यांनी सूत्रसंचालन केले. तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी थोरात यांनी प्रास्ताविक केले.