शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

गणवेश भत्ता देण्याचा विचार सुरू

By admin | Updated: February 14, 2015 01:21 IST

गणवेश भत्ता देण्याचा विचार सुरू

नाशिक : महापालिका कर्मचाऱ्यांसाठी शासकीय संस्थांकडून दर कराराने खरेदी करण्यात येणाऱ्या गणवेशांचा दर्जा उत्तम असेलच असे नाही, ही शंका आता महापालिका प्रशासनालाच भेडसावू लागली असून, यापुढे कर्मचाऱ्यांना गणवेशाचा पुरवठा करण्याऐवजी रोखीने गणवेश भत्ता देण्याचा विचार सुरू आहे. त्यासाठी महापालिकेला दरवर्षी ७२ लाख ५५ हजार रुपये खर्च येणार आहे. सदरचा प्रस्ताव येत्या बुधवारी (दि. १८) होणाऱ्या महासभेत मांडण्यात येणार आहे.महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टावरील सफाई कर्मचारी, चतुर्थश्रेणी कर्मचारी, अग्निशमन कर्मचारी व सुरक्षा अधिकारी या अशा विविध संवर्गातील सुमारे तीन हजार कर्मचाऱ्यांना दरवर्षी गणवेश पुरवठा केला जातो. मात्र, सदर कर्मचाऱ्यांना गणवेश पुरवठा करण्यासाठी शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ मुंबई आणि इतर संबंधित संस्थांकडूनच दर करार पद्धतीने गणवेशाचे कापड आणि साड्यांची खरेदी करण्यात येते. परंतु सदर गणवेशाच्या कापडाच्या दर्जाबाबत अनेकदा कर्मचारी संघटनेने शंका घेतल्या आहेत. त्यानुसार यंदाही म्युनिसिपल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांनी चांगल्या दर्जाचे व नामांकित कंपन्यांचे गणवेश देण्याचा प्रस्ताव महासभेत ठेवला होता. त्यानुसार रेमण्ड, मफतलाल, रिड अ‍ॅण्ड टेलर, मोरारजी मिल आदि नामांकित कंपन्यांचा उल्लेख करण्यात येऊन तसा ठराव मंजूर करण्यात आला; परंतु बॅ्रण्डेड कंपन्यांचा नामोल्लेख करत दर कराराने निविदा मागविण्याला लेखापरीक्षकांनी आक्षेप नोंदविला आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने पोलीस, परिचारिका यांना होणाऱ्या गणवेशाच्या पुरवठ्याची माहिती घेतली असता संबंधितांना गणवेशाऐवजी गणवेश भत्ता दिला जात असल्याचे निदर्शनास आले. त्याप्रमाणे महापालिकेनेही आपल्या कर्मचाऱ्यांना गणवेशाऐवजी गणवेश भत्ता देण्याचा विचार सुरू केला असून, तसा प्रस्ताव येत्या महासभेत मांडला जाणार आहे. (प्रतिनिधी)