लासलगाव येथे ईद ए मिलाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 16:50 IST2018-11-21T16:49:51+5:302018-11-21T16:50:06+5:30
लासलगाव:.इस्लाम धर्माचे पैगंबर हजरत मोहम्मद(स)यांच्या जयंतीनिमित्त लासलगाव येथे बुधवारी जुलूस काढण्यात आला.सकाळी जामा मशीद येथून जुलूस ची सुरवात करण्यात आली.

लासलगाव येथे ईद ए मिलाद
लासलगाव:.इस्लाम धर्माचे पैगंबर हजरत मोहम्मद(स)यांच्या जयंतीनिमित्त लासलगाव येथे बुधवारी जुलूस काढण्यात आला.सकाळी जामा मशीद येथून जुलूस ची सुरवात करण्यात आली.
पिंपळगाव(नजीक)जोशीवाडा,इंदिरानगर,रजा नगर व लासलगाव रेल्वे स्टेशन या ठिकाणी पताका व ध्वजाने परिसर सजविण्यात आले होते.
जुलूस ची सांगता ईदगाह मैदान येथे झाली या वेळी सामुदायिक नियाज शरीफ व धार्मिक कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी मौलाना फारूक अशरफी,मौलाना महमूद आलम,हाफिज तौफिक,मौलाना नूरमोहम्मद यांनी पैगंबरांच्या जीवनावर उपस्थित मुस्लिम बांधवाना मार्गदर्शन केले.
लासलगाव शहर काँग्रेस कमिटी,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच शिवसेना व आरपीआय पक्षाच्या वतीने मौलाना साहेबांचा सत्कार करण्यात आला.या वेळी गुणवंत होळकर, विकास चांदर,युवराज होळकर,विजय भंडारी,पंकज आब्बड, प्रकाश पाटील,उत्तम वाघ, बबन शिंदे ,रामनाथ शेजवळ आदी उपस्थित होते.