शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मी ठाम राहिलो, अन्यथा त्याच वेळी मुख्यमंत्री झालो असतो! छगन भुजबळ यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 11:15 IST

तेव्हा पक्ष फुटला नाही, आताच का फुटला?, शरद पवारांवर साधला निशाणा  

नाशिक : काँग्रेस फुटून त्यातून शरद पवार जेव्हा बाहेर पडले, त्यावेळी मी काँग्रेसमध्येच थांबावे यासाठी काँग्रेसच्या तत्कालीन अनेक दिग्गज नेत्यांनी मला फोन केला. आम्ही तुम्हाला पुढच्या विधानसभा निवडणुकीसाठीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करतो; पण तुम्ही जाऊ नका, असेही सांगितले होते. मात्र, मी त्यावेळी शरद पवार यांच्याबरोबरच राहणार असल्याचे सांगून त्यावर ठाम राहिलो होतो. अन्यथा, ९९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या अधिक सीट आल्याने मी त्याचवेळी मुख्यमंत्री झालो असतो, असा दावा अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केला आहे.   

हवे तर वासनिकांना विचारा...त्यावेळी मी काँग्रेसमध्येच राहावे आणि तुम्ही दिल्लीत या, तुम्हाला मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्याचे फोन करणाऱ्यांमध्ये काँग्रेसमधील माधवराव शिंदे, शीला दीक्षित, राजेश पायलट, सुरेश कलमाडी, ऑस्कर फर्नांडिस यांच्यासारखे नेते होते. मुकुल वासनिक यांनादेखील तुम्ही याबाबत विचारू शकता, असेही भुजबळ यांनी नमूद केले.  

...मग २००४ मध्ये मला उपमुख्यमंत्री का केले? २००४ मध्ये मला मुख्यमंत्री केले असते, तर पक्ष फुटला असता हे शरद पवार यांचे मत का होते, हे त्यांनाच माहीत; पण त्यानंतरही २००४ मध्ये त्यांनी मला उपमुख्यमंत्री केले तरी पक्ष फुटला नव्हता; पण आता तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालीच पक्ष फुटला असे म्हणत भुजबळ यांनी शरद पवार यांना टोला लगावला.२००४ मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद द्यायला काँग्रेसची तयारी होती. तेव्हा भुजबळ किंवा आर. आर. पाटील हे मुख्यमंत्री झाले असते. पण शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदच नाकारले, असे विधान अजित पवार यांनी केले होते. या विधानाला भुजबळ यांनीही पुष्टी दिली. शरद पवारांना त्यावेळी काय अडचण होती, याची कल्पना नाही, असेही भुजबळ म्हणाले.  

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळSharad Pawarशरद पवार