#मी टू मुळे नाशिकच्या कार्पोरेट क्षेत्रांत विशेष दक्षता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:13 IST2018-10-13T23:18:26+5:302018-10-14T00:13:06+5:30

सध्या देशपातळीवर महिलांवरील लैंगिक अत्याचाराचा ‘मी- टू’चा मुद्दा गाजत असून त्याचे लोण विविध क्षेत्रांपर्यंत पोहोचत आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील अनेक कार्पोरेट कंपन्यांनी विशेष दक्षता घेण्यास प्रारंभ केला आहे. अनेक कंपन्यांमध्ये ‘विशाखा’सारख्या तक्रार निवारण समित्या अगोदरच गठित असल्या तरी महिला कर्मचाऱ्यांमध्ये तक्रार करण्याबाबत जागृती केली जात आहे.

# I have a lot of special skills in the corporate sector of Nashik | #मी टू मुळे नाशिकच्या कार्पोरेट क्षेत्रांत विशेष दक्षता

#मी टू मुळे नाशिकच्या कार्पोरेट क्षेत्रांत विशेष दक्षता

ठळक मुद्देमहिलांचे प्रबोधन : तक्रार निवारण समित्याही स्थापन;तातडीने तक्रार करण्याचे सूचना पत्रक

नाशिक : सध्या देशपातळीवर महिलांवरील लैंगिक अत्याचाराचा ‘मी- टू’चा मुद्दा गाजत असून त्याचे लोण विविध क्षेत्रांपर्यंत पोहोचत आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील अनेक कार्पोरेट कंपन्यांनी विशेष दक्षता घेण्यास प्रारंभ केला आहे. अनेक कंपन्यांमध्ये ‘विशाखा’सारख्या तक्रार निवारण समित्या अगोदरच गठित असल्या तरी महिला कर्मचाऱ्यांमध्ये तक्रार करण्याबाबत जागृती केली जात आहे.
बॉलिवूडमध्ये तनुश्री दत्ता हिने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर केलेल्या आरोपानंतर सर्वच क्षेत्रांतील महिलांवरील अत्याचार कळीचा मुद्दा बनला आहे. शैक्षणिक क्षेत्र तसेच कार्पोरेट क्षेत्रातूनदेखील तक्रारी बाहेर येऊ लागल्या आहेत. ज्या ज्या आस्थापनांमध्ये महिला कर्मचारी आहेत, तेथे अशाप्रकारच्या तक्रारी येऊ शकत असल्याने कार्पाेरेट कंपन्यांकडून विशेष काळजी घेतली जात आहे. नाशिकमध्ये मायको, बॉश, महिंद्रा, ग्लॅक्सो असे कारखाने तर आहेतच, शिवाय अनेक कंपन्यांची कार्पोरेट आॅफिसेसदेखील आहेत. बहुतांशी कार्पोरेट कंपन्या आणि कारखान्यांमध्ये अगोदरच विशाखा समित्या स्थापन झाल्या आहेत, परंतु जेथे अशाप्रकारच्या समित्या नव्हत्या तेथे त्या स्थापन करण्यात आल्या आहेत. काही कंपन्यांनी तक्रार निवारण समित्या स्थापन केल्या असून, व्हीसल ब्लोर्इंगची व्यवस्थादेखील केली आहे.
कार्यालयातील कोणत्याही व्यक्तीपासून त्रासाचा अनुभव आला तर तातडीने तक्रार करण्याबाबत सूचना पत्रकेदेखील जारी करण्यात आली आहेत.

Web Title: # I have a lot of special skills in the corporate sector of Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.