शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मी ठरवलंय... सत्यजित तांबेनी सांगितली पुढील राजकीय दिशा, कॉल रेकॉर्डींग व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 15:38 IST

त्यातूनच एका कार्यकर्त्याने त्यांच्याशी फोनवर संवाद साधला. त्यावेळी, तांबे यांनी आपली पुढील भूमिकाच या संवादात जाहीर केली. 

नाशिक/जळगाव - विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये चुरस असल्याचे दिसत आहे. शिंदे-फडणवीस आणि महाविकास आघाडीने अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत एकूण ८३ जण रिंगणात आहेत. मात्र, नाशिक मतदारसंघातील निवडणूक लक्षवेधी ठरत आहे. एकीकडे काँग्रेसला डावलून सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. तर, अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यावरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच, सत्यजित तांबेंची भूमिका नेमकी काय हे समजत नाही. त्यातूनच एका कार्यकर्त्याने त्यांच्याशी फोनवर संवाद साधला. त्यावेळी, तांबे यांनी आपली पुढील भूमिकाच या संवादात जाहीर केली.

नाशिक पदवीधर मतदारसंघात शुभांगा पाटील यांना पाठिंबा देण्यास शिवसेना तयार आहे. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठिंबा देण्याबाबत निर्णय झाला नसल्याचे सांगितले जात आहे. तर, काँग्रेस नेते डॉ. सुधीर तांबे यांनी ऐनवेळी दगाफटका केल्याने पक्ष श्रेष्ठींद्वारे त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली. तर त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांच्याविरोधातही कारवाईचे संकेत आहेत. त्यामुळे, महाविकास आघाडीचा शुभांगी पाटील यांना पाठिंबा मिळणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तर, सत्यजित तांबेंनी भाजपा पाठिंबा देणार का, हेही लवकरच स्पष्ट होईल. दरम्यान, सत्यजित तांबेंसोबतचे कार्यकर्त्याचे एक कॉले रेकॉर्डींग व्हायरल झाले आहे. त्यामध्ये सत्यजित यांनी आपली पुढील भूमिका जाहीर केली. 

जळगावमधील सुधीर ठाकूर नामक मतदार कार्यकर्त्याशी बोलतानाचे हे कॉल रेकॉर्डींग आहे. त्यामध्ये, सत्यजित तांबे यांनी आपल्या पुढील राजकारणाची दिशाच सांगितली आहे. मला यापुढे पक्षीय राजकारणापलिकडे जाऊन काम करायचं आहे. मी ठरवलंय आता पक्षीय राजकारणापलीकडे काम करणार आहे. सध्या मी अपक्ष उमेदवार म्हणून काम करत आहे. लवकरच माझी भूमिकाही महाराष्ट्राला कळेल. आपण केवळ हे वादळ शांत व्हायची वाट पाहतोय, वादळात वादळ असं व्हायला नको. 

सगळं शांत होऊ द्या, मग १९ ते २० तारखेला तुम्हाला सगळं कळेल, असे म्हणत सत्यजित तांबे यांनी कार्यकर्त्याशी संवाद साधला आहे. या दोघांमधील कॉल रेकॉर्डींग आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे, सत्यजित तांबे यांच्या भूमिकेसाठी मतदारांना आणि कार्यकर्त्यांना आणखी २ ते ३ दिवस वाट पाहावी लागणार आहे.  

टॅग्स :Satyajit Tambeसत्यजित तांबेNashikनाशिकcongressकाँग्रेसBJPभाजपा