अडथळ्यांच्या शर्यती, परवाने अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:28 IST2017-09-23T23:56:23+5:302017-09-24T00:28:30+5:30

शेतकºयांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या खते, बियाणे व कीटकनाशके कृषी निविष्ठांची दुकान्यांचे परवाने मिळविण्यासाठी नवनवीन कायदे तयार होत आहेत. कीटकनाशके विक्रीचा परवाना दोन वर्षे, तर बी-बियाणे विक्रीचा परवाना तीन वर्षांसाठी दिला जातो. त्यासाठी दरवर्षी नूतनीकरण आवश्यक असते. कीटकनाशके विक्रेत्यांना नूतनीकरणाची गरज नसली तरी परवान्यासाठीच्या अटी जाचक आहेत.

Hurdles, Turning Transit Troubles | अडथळ्यांच्या शर्यती, परवाने अडचणीत

अडथळ्यांच्या शर्यती, परवाने अडचणीत

गणेश धुरी।
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शेतकºयांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या खते, बियाणे व कीटकनाशके कृषी निविष्ठांची दुकान्यांचे परवाने मिळविण्यासाठी नवनवीन कायदे तयार होत आहेत. कीटकनाशके विक्रीचा परवाना दोन वर्षे, तर बी-बियाणे विक्रीचा परवाना तीन वर्षांसाठी दिला जातो. त्यासाठी दरवर्षी नूतनीकरण आवश्यक असते. कीटकनाशके विक्रेत्यांना नूतनीकरणाची गरज नसली तरी परवान्यासाठीच्या अटी जाचक आहेत. काही दिवसांपूर्वीच घोटी (ता. इगतपुरी) येथे खतेविक्रीच्या परवान्याच्या जागी चक्क मद्यविक्री सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला. या दुकानावर तीन महिन्यांसाठी खते विक्रीचा परवाना निलंबित करण्यात आला असला तरी त्या अनुषंगाने एकूणच खतांच्या परवाने व नूतनीकरणाच्या आडून चालणारे गोरखधंदे उघड झाले. काही बोटावर मोजण्याइतक्या बदमाशी करणाºया लोकांमुळे सरसकट सर्वच खते व बियाणे विक्रेत्यांकडे संशयाने पाहिले जात आहे. वास्तविक पाहता हे दुकाने गावातल्या गावात शेतकºयांना त्यांच्या खरीप आणि रब्बी हंगामासाठी आवश्यक ती बी-बियाणे आणि खते उपलब्ध करून देत असतात. त्यासाठीच्या अटी-शर्ती पाहिल्या तर सहजपणे कोणालाही कृषी निविष्ठा विक्रीचा परवाना मिळेलच याची शाश्वती नाही. मात्र अनेक दिव्यातून तावूनसुलाखून परवाना मिळविलेल्या परवानाधारकांनीही मिळालेल्या परवान्यानुसारच शासनाचे नियम-निकष पाळून कृषी निविष्ठांची विक्री केली पाहिजे. कृषी निविष्ठांसाठी असलेल्या जाचक अटींमुळे सर्व सामान्य शेतकरी अथवा एखादा पदवीधारक सुशिक्षित बेरोजगार युवकाने स्वत:चाच व्यवसाय सुरू करण्यासाठी कृषी निविष्ठा परवाना काढायचे ठरविल्यास त्यासाठी ती तारेवरची कसरत असते.  कीटकनाशके विक्रीच्या परवान्यासाठी स्वतंत्र दुकान व स्वतंत्र गुदामासाठी जागा आवश्यक असणे बंधनकारक आहे. तसेच कीटकनाशक विक्रीचा परवाना ज्याच्या नावावर घ्यायचा आहे, तो पदवी किंवा पदविकाधारक असण्याची अट आहे. म्हणजेच प्रत्येकालाच पदवी, पदविका मिळवूनच परवाना काढावा लागेल. प्रत्येकाकडेच ती जागा उपलब्ध होईल, असे नाही. सातबारा काढण्यापासून ते कृषी निविष्ठा परवाना काढण्यापर्यंत अनेक अडचणींचा डोंगर पार करावा लागतो. हा अडचणींचा डोंगर पार केलाच तरीही शुल्लक कारणांनी परवाना निलंबनाची टांगती तलवार कृषी निविष्ठाधारकांवर कायम असते. भरारी पथकांची पाहणी आणि तपासणीही बºयाच वेळा कृषी निविष्ठाधारकांची डोकेदुखी वाढविणारी असते. बºयाच वेळा आॅनलाइन अर्ज करूनही कृषी निविष्ठा परवाना मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेत चकरा माराव्या लागतात.

Web Title: Hurdles, Turning Transit Troubles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.