शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
6
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
7
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
8
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
9
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
10
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
11
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
12
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
13
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
14
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
16
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
17
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
18
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
19
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
20
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ

राज्यात सव्वा लाख शिक्षकांच्या जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 23:59 IST

राज्यात दरवर्षी दोन ते तीन टक्के याप्रमाणे १५ ते १६ हजार शिक्षक निवृत्त होत असून, २०१२ पासून आतापर्यंत राज्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या सव्वा लाखावर पोहोचली असून, शासनाच्या शिक्षकभरती पोर्टलवर मात्र केवळ १२ हजार शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याचे दाखविले जात आहे.

नाशिक : राज्यात दरवर्षी दोन ते तीन टक्के याप्रमाणे १५ ते १६ हजार शिक्षक निवृत्त होत असून, २०१२ पासून आतापर्यंत राज्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या सव्वा लाखावर पोहोचली असून, शासनाच्या शिक्षकभरती पोर्टलवर मात्र केवळ १२ हजार शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याचे दाखविले जात आहे. रिक्त जागांची संख्या मिळविणे ही यंत्रणाच सदोष असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष तथा अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी केले आहे.महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या नाशिक जिल्हा शाखेतर्फे रविवारी (दि.२८) मु. शं. औरंगाबादकर सभागृहात शिक्षण तपस्वी पुरस्कारांचे वितरण सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार किशोर दराडे, मविप्रचे सभापती माणिकराव बोरस्ते, संचालक भाऊसाहेब खातळे, प्राचार्य राम कुलकर्णी, गोपाळ पाटील आदी उपस्थित होते. अभ्यंकर म्हणाले, शिक्षकांमध्ये त्यांच्या वेतनपद्धतीत बदल होत असल्याविषयीचे गैरसमज पसरविणारे संदेश फिरत असून, वास्तविकतेत शासनाकडून अस्तित्वात नसलेल्या कालबाह्य झालेल्या तरतुदी रद्द केल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे विनाअनुदानित शिक्षकांची स्थिती अतिशय दयनीय असून, अशा शाळांचा प्रश्न सरकाने सोडविण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. यापुढे केवळ स्वयंअर्थसाह्यित शाळांनाच परवानगी मिळणार असून, त्यामुळे केवळ इंग्रजी शाळाच सुरू होऊ शकणार असून, मराठी, हिंदी, उर्दू माध्यमांच्या शाळांसाठी कठीण स्थिती असून अशा अनुदानित शाळाच सुरू होणार नाही. पात्र शाळांना अनुदान देण्यासाठी सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केलेला निधी वापरावा यासाठी पाठपुरावा करण्याचे आवाहनही त्यांनी केले. प्रास्ताविक शिक्षक सेनेचे विभागीय अध्यक्ष संजय चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन राजेश भुसारे यांनी केले. मधुकर वाघ यांनी आभार मानले.बादशाह, वैद्य, निरगुडे यांना जीवनगौरवनाशिक जिल्हा शिक्षक सेनेतर्फे शिक्षणक्षेत्रात कार्यरत असताना समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर संघटनेचे फिरोज बादशहा, शारदा विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे सुभाषचंद्र वैद्य, पगारदारांच्या सहकारी पतसंस्थेचे शिवाजी निरगुडे यांना जीवनगौरव पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.शिक्षणतपस्वी पुरस्कारार्थीजिल्हास्तरावर मच्छिंद्र कदम, रावसाहेब जाधव, दिनेश अहिरे, मीनाक्षी गायधनी, भरत पवार, सोपान वाटपाडे, अरुण पाटील, भागवत आरोटे, अरुण जायभावे, डॉ. विठ्ठलसिंग ठाकरे, नईम शाहिन, राजेंद्र भुसारे, नितीन गायकवाड, भाऊसाहेब कापडणीस, दिलीप अहिरे, अशोक बागुल, सी. एम. फुलपगार, माधुरी कुलथे, अजिज सय्यद, राजेंद्र बनसोडे, सोमनाथ धात्रक यांना शिक्षणतपस्वी पुरस्काराने गौरविण्यात आले. इतर विभागस्तरावर देवीदास बुधवंत, भाऊसाहेब भोगाडे, आप्पासाहेब शिंदे, राजेश जाधव, सुरेश पाटील, राजेंद्र वाघ, उमाकांत गुरव, अजय अमृतकर, भाऊराव पाटील, अनिल साळुंके यांचा शिक्षणतपस्वी पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षक