त्र्यंबकहून शेकडो मजुरांची घरवापसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 23:43 IST2020-05-11T21:36:08+5:302020-05-11T23:43:07+5:30
त्र्यंबकेश्वर : गेल्या अनेक वर्षांपासून तर काही पाच-सहा महिन्यांपासून विविध व्यवसाय, मजुरी, धंदे करत असलेले राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, उत्तराखंड आदी राज्यातील सुमारे ३६७ परप्रांतीय मजूर सोमवारी बसने आपआपल्या परिसरात रवाना झाले.

त्र्यंबकहून शेकडो मजुरांची घरवापसी
त्र्यंबकेश्वर : गेल्या अनेक वर्षांपासून तर काही पाच-सहा महिन्यांपासून विविध व्यवसाय, मजुरी, धंदे करत असलेले राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, उत्तराखंड आदी राज्यातील सुमारे ३६७ परप्रांतीय मजूर सोमवारी बसने आपआपल्या परिसरात रवाना झाले.
त्र्यंबकेश्वर परिसरात विविध ठिकाणी कामे मजूर मजुरी धंदा करत होते. मध्य प्रदेश राज्यात जे पायी जाण्यासाठी निघाले होते. तसेच जव्हार, पालघर, डहाणू मार्गाने नाशिकहून मध्य प्रदेशकडे पायी जात असलेल्या नागरिकांबद्दल त्र्यंबकेश्वर तहसीलदार तथा आरोग्य विभागास अशा लोकांची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सदर मजुरांकरिता तातडीने वाहने पाठवून त्यांना त्र्यंबकच्या मेळा बसस्थानकात एकत्र केले. ते आज रवाना झाले.
मजुरांना जेवण व पाणी देऊन बसमध्ये बसविण्यात आले. त्र्यंबकेश्वर येथून दोन बसेस त्यांच्या गावाजवळ सोडणार आहे. या दोन्हीही बसेस रवाना होताना उपविभागीय अधिकारी भीमाशंकर ढोले, तहसीलदार दीपक गिरासे, नायब तहसीलदार सुरेश कांबळे, डॉ. योगेश मोरे उपस्थित होते.