शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

भेटवस्तू, पुष्पगुच्छांऐवजी समाजकार्यासाठी हुंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 6:33 PM

अभिनव उपक्रम : शिंपी समाजाध्यक्षाने पाडला पायंडा

ठळक मुद्देस्वत:  अध्यक्षाने स्वत:पासून या उपक्रमाची सुरुवात करत पायंडा पाडल्याने समाजातील पदाधिकाऱ्यांनी त्याचे अनुकरण इतरांनीही करण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प सोडला.

नाशिक : स्वागत समारंभ अथवा विवाह सोहळा म्हटला की, भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ आलेच. बव्हंशी भेटवस्तू या घरातील माळ्यावरची अडगळ ठरतात तर पुष्पगुच्छाचे निर्माल्य दुसऱ्या दिवशी घंटागाडीत फेकले जाते. भेटवस्तू आणि पुष्पगुच्छांवर हजारो रुपये खर्च होतात आणि तो वायाही जातो. मात्र, याच भेटवस्तू आणि पुष्पगुच्छांऐवजी विवाह सोहळ्यात थेट हुंडी ठेवून समाजातील गरीब-गरजूंच्या उत्थानासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करणारा उपक्रम क्षत्रिय अहिर शिंपी समाजाचे  अध्यक्ष सुनील निकुंभ यांनी आपल्या कन्येच्या विवाह समारंभात राबविला आणि समाजातील सर्वांनीच या अनोख्या उपक्रमाचे अनुकरण करण्याचा सल्ला प्रसिद्ध सिनेअभिनेता गोविंद नामदेव यांनी यावेळी दिला.अखिल भारतीय क्षत्रिय अहिर शिंपी समाजाचे  अध्यक्ष सुनील निकुंभ यांच्या कन्येचा विवाह नुकताच झाला. या विवाह सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेतच निकुंभ यांनी नवदाम्पत्यास शुभाशिर्वाद देण्यात येणाºया पाहुण्यांना कोणतीही भेटवस्तू अथवा पुष्पगुच्छ आणण्याऐवजी विवाहस्थळी ठेवलेल्या हुंड्यांमध्ये रोख स्वरुपात आर्थिक योगदान देण्याचे आवाहन केले. सदर हुंड्यामधून जमा झालेला निधी आणि त्यात स्वत: निकुंभ कुटुंबीयांकडून काही रकमेची भर घालत त्याचा वापर समाजातील गरजू आणि गरीब लोकांच्या उत्थानासाठी करण्याचा संकल्प सोडण्यात आला. त्यानुसार, विवाहस्थळी जागोजागी हुंड्या ठेवण्यात आल्या आणि आलेल्या पाहुण्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत त्याला भरभरुन प्रतिसादही दिला. यावेळी उपस्थित राहिलेले प्रसिद्ध सिनेअभिनेते गोविंद नामदेव यांनी समाजामध्ये लग्नविधीत अनेक रूढी ,परंपरा, मानपान यांना फाटा देऊन त्यातून जमा झालेली रक्कम समाजातील गरजू, गरीब समाज बांधवांसाठी वापरली तर कन्यादानाचे पुण्य लाभेल, असा सल्ला दिला. स्वत:  अध्यक्षाने स्वत:पासून या उपक्रमाची सुरुवात करत पायंडा पाडल्याने समाजातील पदाधिकाऱ्यांनी त्याचे अनुकरण इतरांनीही करण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प सोडला.

कन्येच्या विवाहापासून  उपक्रमाची सुरुवात

भेटवस्तू, पुष्पगुच्छ यावर हजारो रुपये खर्च होतो. त्यातील बराच वाया जातो. सदर अहेर सप्तात्री लागावा आणि समाजातील उपेक्षितांसाठी त्याचा काही वापर करता येईल काय, असा विचार पुढे आला आणि कन्येच्या विवाहापासून या उपक्रमाची सुरुवात केली. समाजबांधव आपल्याही सोहळ्यात हा पायंडा पुढे नेतील अशी अपेक्षा आहे.- सुनिल निकुंभ, अध्यक्ष, शिंपी समाज

टॅग्स :Nashikनाशिकmarriageलग्न