पंचवटीत महिलेच्या घरात शिरून विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 10:52 PM2020-10-03T22:52:23+5:302020-10-04T01:11:10+5:30

पंचवटी : परिसरात राहणा?्या एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी नाशिकरोड गोरेवाडी येथे राहणा?्या दोघांवर विनयभंग केल्याचा गुन्हा पंचवटी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

Humiliation in a woman's house in Panchavati | पंचवटीत महिलेच्या घरात शिरून विनयभंग

पंचवटीत महिलेच्या घरात शिरून विनयभंग

Next
ठळक मुद्देप्राणायाम करताना वृध्दाचा मृत्यु

क्राईम डायरी
पंचवटी : परिसरात राहणा?्या एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी नाशिकरोड गोरेवाडी येथे राहणा?्या दोघांवर विनयभंग केल्याचा गुन्हा पंचवटी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी दुपारी संशयित आरोपी किरण दत्तात्रय पांडे, सोमेश किरण पांडे असे दोघेजण फिर्यादी महिलेच्या घरी दुपारच्या वेळी आले व ते फिर्यादीच्या नणंदबाईला शिवीगाळ करत असताना तिचे सासरे वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी करत असतांना संशयितांनी त्यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली तसेच एका संशयिताने फिर्यादी महिलेच्या जवळ येऊन तिच्या अंगावर हात टाकून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत पुन्हा आमच्या भांडणात पडल्या तर हात पाय तोडून टाकू अशी धमकी दिली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक तात्या वाघ तपास करत आहेत.

तरूणावर धारदार शस्त्राने वार
नाशिक : मित्रांसमवेत गप्पा मारत उभ्या असलेल्या एका तरूणावर दोघा संशयित हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना सिडकोतील डीजीपीनगर-2 भागात घडली. या घटनेत युवक जखमी झाला असून पोलीसांनी दोघा संशयीतांना बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किशोर आहेर उर्फ घा?्या व संजू साळुंके अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी अक्षय उत्तम जाधव (२१ रा.दत्तनगर, चुंचाळे) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. अक्षय गुरूवारी (दि.१) डीजीपीनगर भागात गेला होता. लॉर्डस बेकरी समोर तो आपल्या मित्रांसमवेत गप्पा मारत असताना ही घटना घडली. दोघा संशयीतांनी अक्षय यास गाठून कुठलेही कारण नसतांना शिवीगाळ केली. यावेळी त्याने प्रतिकार केला असता दोघांनी लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करीत धारदार शस्त्राने हल्ला केला. या घटनेत जाधव जखमी झाला असून पसार झालेल्या दोघांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

प्राणायाम करताना वृध्दाचा मृत्यु
नाशिक : प्राणायाम करीत असतांना बेशुध्द पडल्याने ६७ वर्षीय वृद्दाचा मृत्यु झाला. ही घटना गोल्फ क्लब मैदानावर घडली. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
श्यामसुंदर हरिहर तालुकदार (६७ रा.न्युक्लेअर स्मार्ट सोसा.भाभानगर) असे मृत इसमाचे नाव आहे. तालुकदार शुक्रवारी (दि.२) नेहमीप्रमाणे व्यायामासाठी गोल्फ क्लब मैदानावर गेले होेते. प्राणायाम करीत असतांना अचानक ते बेशुध्द पडल्याने ही घटना घडली. उपस्थीतांच्या ही बाब लक्षात येताच त्यांना तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल करण्यात आले परंतू उपचारापूर्वी वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले.

 

Web Title: Humiliation in a woman's house in Panchavati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.