शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
2
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
5
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
6
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
8
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
9
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
10
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
11
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
12
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
13
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
14
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
15
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
16
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
17
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
18
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
19
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
20
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका

कसे म्हणावे, भुजबळांचा करिश्मा संपला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 01:08 IST

सौभाग्यवतीचं लेणं लुटणं असो की गल्लीतील दादांनी लढलेला रक्तरंजित लढा, गावतलाठ्याची बदली असो किंवा जिल्ह्याच्या प्रशासन व्यवस्थेतील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, ग्रामपंचायत सदस्याची निवडणूक असो की सर्वपक्षीय राजकीय पदाधिकाºयांच्या नेमणुका आणि कोणतीही घटना, घडामोड.. छगन भुजबळ यांचा संबंध नाही असे कधी घडलेच नाही.

नाशिक : सौभाग्यवतीचं लेणं लुटणं असो की गल्लीतील दादांनी लढलेला रक्तरंजित लढा, गावतलाठ्याची बदली असो किंवा जिल्ह्याच्या प्रशासन व्यवस्थेतील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, ग्रामपंचायत सदस्याची निवडणूक असो की सर्वपक्षीय राजकीय पदाधिकाºयांच्या नेमणुका आणि कोणतीही घटना, घडामोड.. छगन भुजबळ यांचा संबंध नाही असे कधी घडलेच नाही. फार दूरची गोष्ट नाही, झालीत उणीपुरी चार वर्षे व त्यातीलही तुरुंगात काढलेले २६ महिने सोडले, तर एकेकाळी राज्याचे हेविवेट मंत्री म्हणून राहिलेल्या भुजबळ यांचा करिश्मा आता जवळपास संपला असेच वाटू लागले आहे. अगदी त्यांच्या कर्मभूमीत स्वपक्षीय उमेदवाराचा विधान परिषदेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्यावर तर पुन्हा तसा करिश्मा परत येईल की नाही याविषयी शंका वाटू लागली आहे; परंतु भुजबळ यांच्याशी त्याकाळी प्रत्येक गोष्टीशी जोडण्यात येत असलेल्या संबंधातील घटना, घडामोडी मात्र अजूनही कायम आहेत.राष्टÑवादीच्या स्थापनेलाच पक्षाचे राज्याचे प्रमुखपद घेऊन मैदानात उतरलेल्या छगन भुजबळ यांनी दुसºयाच वर्षी येवला मतदारसंघाचे मैदान निवडणुकीसाठी निवडले व मतदारांनीही भुजबळ यांना दणदणीत मताधिक्याने निवडून पाठविले. त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत राष्टवादीची यशाची कमान कायम उंचावत राहिली. नाशिककरांनी केलेल्या सहकार्यावर भुजातील ‘बळ’ वाढतच गेले, परिणामी अगदी विधान परिषदेच्या मतदारसंघात पक्षाचा एकमेव सदस्य असताना देवीदास पिंगळे यांनी निवडणुकीत बाजी मारण्याचा विक्रमही भुजबळांच्या काळातच राष्टÑवादीने केला. त्यामुळे राज्यात व केंद्रातही सत्तेत दहा वर्षे सहभागी राहिलेल्या राष्टÑवादीचा नाशिक जिल्ह्यात दबदबा कायम राखण्यात भुजबळ यांना यश आले. या यशातून साहजिकच पक्षाची सारी सूत्रे त्यांच्या हाती आली.एवढेच नव्हे तर भुजबळ यांची राजकीय कारकीर्द व सर्वपक्षीय असलेले संबंध पाहता अन्य पक्षांतील घटना, घडामोडी भुजबळ यांच्या भोवती फिरू लागल्या. सत्तेचे लाभलेले पाठबळ, अफाट जनसंपर्क व अशक्याचे शक्य करून दाखविण्याचे असलेले कसब यामुळे भुजबळ यांचे राजकीय वर्चस्व विरोधकांप्रमाणेच स्वकीयांनाही डाचू लागले; परिणामी प्रत्येक गोष्टीशी भुजबळ यांचा संंबंध जोडून गेल्या पाच ते सहा वर्षांपासून त्यांच्या विरोधात मोहीम राबविण्यात आली. कधी भुजबळांचा गुन्हेगारांशी तर कधी गुंडांशी संबंध, काळे धंदे, अवैध व्यावसायिकांना कायमच त्यांच्याकडून अभय दिले जात असल्याचे किटाळ लावण्यात आले. महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी लुटणे असो वा खंडणीखोरांनी मांडलेल्या उच्छादाला भुजबळ व त्यांचे समर्थकच कसे जबाबदार याचे गल्लोगल्ली पोवाडेच सादर केले गेले. संपूर्ण नाशिककर भुजबळांच्या जाचाने भयभीत होऊन परजिल्ह्यात स्थलांतर करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र रंगविण्यात आले.बेरोजगारी, भूकबळी, औद्योगिक तंट्यांना भुजबळच कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले व हा सर्व अनीती, अन्याय, अत्याचार भुजबळ यांच्या इशाºयावरच चालत असल्याने त्यातून मुक्तीसाठी भुजबळ यांचा लोकसभेच्या निवडणुकीत पराभव करून वचपा काढण्यात आला. तुरुंगात बंदिस्त झाल्यानंतर भुजबळ संपल्याची आवई विरोधकांनी उठविली. भुजबळ यांच्या गैरहजेरीत मात्र त्यांच्या काळात नाशिककरांवर होणारा उपरोक्त अन्याय कायम राहिला; पण त्याची जबाबदारी मात्र कोणावर निश्चित करण्याची तसदी घेतली गेली नाही. आता तर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर भुजबळ तुरुंगातून बाहेर पडले व थेट रुग्णशय्येवर गेले. विधान परिषदेच्या निवडणुकीची सारी जबाबदारी आपसूकच अजित पवार, जयंत पाटील यांच्यावर येऊन पडली. पण करिश्मा संपलेल्या भुजबळ यांचा आशीर्वाद सहाणे यांना कामी न आल्याने पराभव पदरात पडला. विजयी झालेले नरेंद्र दराडे ‘भुजबळ यांच्या सहकार्याने विजय मिळाला’ अशी प्रतिक्रिया देत असतील तर भुजबळांचा करिश्मा संपला, असे कसे म्हणता यावे?

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळ