रस्ता दुरुस्त न केल्यास टोल तरी कसा भरायचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:15 IST2021-09-19T04:15:50+5:302021-09-19T04:15:50+5:30

इगतपुरी : गोंदे ते वडपे दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ च्या दुरवस्थेमुळे अपघातात अनेकांना जीव गमवावे लागले आहे, ...

How to pay toll if road is not repaired | रस्ता दुरुस्त न केल्यास टोल तरी कसा भरायचा

रस्ता दुरुस्त न केल्यास टोल तरी कसा भरायचा

इगतपुरी : गोंदे ते वडपे दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ च्या दुरवस्थेमुळे अपघातात अनेकांना जीव गमवावे लागले आहे, त्यामुळे या महामार्गाच्या झालेल्या दुरवस्थेसंबंधीत अधिकाऱ्यांना खासदार हेमंत गोडसे यांनी धारेवर धरले.

वडपे ते नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ ची मागील काही दिवसांपासून पूर्ण चाळण झाल्याच्या वृत्त मागील काही दिवसांपासून प्रसिद्धी झाल्या होत्या. खासदार गोडसे यांनी त्वरित या बातम्यांची दखल घेत संबंधीत ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना पत्र व्यवहार करून माहिती घेत नाशिक, घोटी, इगतपुरी व कसारा घाटापर्यंत पाहणी दौरा केला महामार्गाची दुरवस्था बघून टोल कंपनीचे अधिकारी व ठेकेदार यांना खडे बोल सुनावले.

मुंबई-नाशिक दररोज प्रवास करणाऱ्यांनी तसेच स्थानिक नागरिकांनी खासदारांना रस्त्याच्या दुरवस्थेसंदर्भात माहिती दिली असता, खासदार गोडसे यांनी अचानक केलेल्या दौऱ्यामुळे संबंधित अधिका-यांची चांगली धावपळ उडाली होती. अधिकाऱ्यांनी खासदारांना पुढील आठ दिवसांत रस्त्याची दुरुस्ती आणि खड्डे भरण्याचे आश्वासन दिले. यावर खासदार गोडसे यांनी संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना खडे बोल सुनावले.

दररोज होणाऱ्या अपघातांची जाणीव करून देत जीव जाणाऱ्या नागरिकांची संख्या बघता स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांची देखील अवहेलना होत असल्याने गोडसे यांचा राग अनावर झाला होता.

चौकट...

रस्त्याची अक्षरशः चाळण झालेले दृश्य.

रस्ता जर व्यवस्थित नसेल तर टोलसुद्धा घ्यायचा अधिकार नाही असे खडे बोल खासदार यांनी सुनावले यावर त्वरित तोडगा न निघाल्यास संबंधित मंत्री यांना संदर्भात माहिती देऊन टोल बंद करावा आणि रस्ता दुरुस्त झाल्यानंतर नागरिकांकडून टोलवसुली करावी, असे मत व्यक्त केले.

180921\img-20210918-wa0034.jpg

खासदार गोडसेंनी केली महामार्ग 3 ची पाहणी

Web Title: How to pay toll if road is not repaired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.