शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 13:11 IST

काल मुंबईत घडलेली घटना ही दुर्दैवी होती. एअर पोर्टकडे जाताना असे अनेक होर्डींग दिसतात, हे होर्डिंग समांतर हवे होते परंतु ते रस्त्यावर आहेत. - छगन भुजबळ

पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केलेली आकडेवारी ही ज्योतिषी सारखे आहे. 4 जूनला किती वेळ राहिला आहे, थोडा धीर धरायला काय हरकत आहे, परिणाम व्हावा म्हणून अशी वक्तव्ये होत असतील, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले. तसेच संजय राऊतांनी केलेल्या पैशांच्या बॅगांवर आपल्याला काही माहिती नाही, असे भुजबळ म्हणाले. तसेच मोदींच्या सभेचा आढावा घेण्याची आपलीही तयारी असल्याचे भुजबळ म्हणाले. 

काल मुंबईत घडलेली घटना ही दुर्दैवी होती. एअर पोर्टकडे जाताना असे अनेक होर्डींग दिसतात, हे होर्डिंग समांतर हवे होते परंतु ते रस्त्यावर आहेत. त्यांचे वजन सुद्धा भरपूर आहे. सगळे अनधिकृत आहेत. या घटनेची चौकशी झाली पाहिजे. बेकायदेशीर आहे मग वेळ कशाला काढता? असा सवाल करत भुजबळ यांनी सगळ्याच संस्थांनी याची काळजी घेतली पाहिजे, असे मत व्यक्त केले. 

रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांचा गुन्हा काय? शासन 5 लाख देईल, म्हणजे संपले का? असा सवाल करत भुजबळ यांनी  जितका आकार असायला हवा होता त्या पेक्षा खूप मोठा आकार त्या होर्डिंगचा होता, असा आरोप केला. 

तसेच होर्डिंग कंपनीचा मालक भावेश भिडे आणि मातोश्रीचा संबंध असल्याचा आरोप भाजपा आमदार, नेत्यांनी केला होता. यावर भुजबळांनी उद्धव ठाकरेंचा काय संबंध? असा थेट सवाल करत भाजप नेत्यांचे आरोप खोडून काढले आहेत. सरकार आमचे आहे. महानगर पालिका सुद्धा सध्या आमचीच आहे. असे अनेक लोक असतात, व्यापारी सगळ्यांकडे येतात. मिठाई घेऊन येतात आणि फोटो काढतात, यात राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नका असा सल्लाही भुजबळ यांनी दिला आहे.  

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४