सर्व क्षेत्रात आघाडीवर असलेला मराठा समाज मागास कसा? छगन भुजबळ यांचा थेट सवाल 

By संजय पाठक | Published: February 16, 2024 05:19 PM2024-02-16T17:19:44+5:302024-02-16T17:21:19+5:30

सरसकट कुणबीकरण थांबवण्याची मागणी.

How is the maratha society backward which is leading in all fields direct question of chhagan bhujbal to the state government | सर्व क्षेत्रात आघाडीवर असलेला मराठा समाज मागास कसा? छगन भुजबळ यांचा थेट सवाल 

सर्व क्षेत्रात आघाडीवर असलेला मराठा समाज मागास कसा? छगन भुजबळ यांचा थेट सवाल 

संजय पाठक, नाशिक: मराठा समाज सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे मात्र हा समाज त्यामुळेच मागास कसा ठरू शकतो असा प्रश्न ओबीसी नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या शुक्रे समितीचा अहवाल आज शासनाला सादर झाला त्या पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनीही प्रतिक्रिया दिली. 

शुक्रे समितीचा अहवाल अद्याप आपल्याला मिळालेला नाही त्यामुळे त्यात काय म्हटले स्पष्ट होत नाही. मात्र मराठा समाज सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे असे भुजबळ म्हणाले अर्थात मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी सर्वच पक्षांची भूमिका असून आपले हे त्याला समर्थन आहे मात्र ओबीसी मधून आरक्षण देऊ नये एवढीच आपली मागणी होती। मराठा समाजाचे सरसकट कुणबीकरण करू नका असेही त्यांनी राज्य शासनाला सूचित केले. शुक्रे समितीने अवघ्या काही दिवसात दीड कोटी नागरिकांचे सर्वेक्षण करून शासनाला अहवाल सादर केला आहे ही चांगली बाब आहे मग असा असेल तर जातीनिहाय सर्वेक्षण करणे ही आवश्यक होते असेही भुजबळ म्हणाले.

 सध्याच्या आरक्षणाच्या स्थितीमुळे ओबीसी समाज अस्वस्थ असून भविष्यात नेत्यांशिवाय ते आंदोलन करू शकतील असेही अशी भीती भुजबळ यांनी व्यक्त केली.

Web Title: How is the maratha society backward which is leading in all fields direct question of chhagan bhujbal to the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.