देवळा तालुक्यात घरांची पडझड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 00:44 IST2020-06-06T21:32:49+5:302020-06-07T00:44:37+5:30
देवळा बुधवारी आलेल्या चक्रीवादळामुळे तालुक्यातील काही गावात घरांची पडझड झाली आहे, सुदैवाने या कोणतीही जीवितहानी किंवा शेतीपिकांचे नुकसान झाले नसल्याची प्राथमिक माहिती तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांनी दिली आहे.

देवळा येथील पंडीत भिका आहीरे यांच्या घराची झालेली पडझड
देवळा : बुधवारी आलेल्या चक्रीवादळामुळे तालुक्यातील काही गावात घरांची पडझड झाली आहे, सुदैवाने या कोणतीही जीवितहानी किंवा शेतीपिकांचे नुकसान झाले नसल्याची प्राथमिक माहिती तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांनी दिली आहे.
चक्रीवादळ येणार असल्याची पूर्वकल्पना हवामान खात्याने दिलेली असल्यामुळे तालुक्यातील शासकीय यंत्रणा, व नागरिक सतर्क झाले होते. सोशल मिडिया, तसेच स्थानिक प्रशासनाच्या वतीने नागरीकांना चक्र ीवादळाबाबत पुर्व सुचना देण्यात येऊन याबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत माहीती देण्यात आली होती. याचा सकारात्मक परीणाम झाल्याचे दिसून आले. यामुळे शेतकरी वर्गाने शेतात उघडयावर असलेल्या भुईमुग, मका आदी पीकांबाबत योग्य ती काळजी घेतली व चाळीत साठवलेला कांदा भिजू नये याबाबत खबरदारी घेतल्यामुळे तालुक्यात शेती पीकांचे कोणतेही नुकसान झाले नाही. तसेच नागरीकांनी दिवसभर घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतला होता. दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी पडत असल्यामुळे रस्त्यावरील रहदारी रोडावली होती. दिवसभर शांत असलेल्या हवेने रात्री मात्र रौद्र रूप धारण केले होते. त्यातच पाऊसही सुरू होता. यामुळे तालुक्यातील पंडित भिका आहीरे (देवळा), पांडुरंग सखाराम सुर्यवंशी (फुले नगर), सखुबाई महादू सोनवणे (मेशी ), भिकुबाई बधा बागुल (मेशी), रामचंद्र लक्ष्मण आहेर (विठेवाडी), धनजी श्रीपत जाधव (खर्डे) आदी शेतकऱ्यांच्या घराची भींत कोसळणे, छतावरील कौले पडणे, अथवा घराची पडवी पडल्यामुळे नुकसान झाले आहे.